पुणे : जिल्ह्यातील इंदापूर(Indapur) तालुक्यात नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने (Minor Girl) टोकाचे पाउल उचलत राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (Sucide) केली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

इंदापूर तालुक्यातील बोरी मध्ये (Bori) अल्पवयीन गळफास घेत आत्महत्या केली आहे. छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने सुसाईड नोट (Suicide Note) लिहून ठेवली आहे.

अल्पवयीन मुलगी ज्या गावात राहत होती त्या गावातील ३ मुलांच्या छेडछाडीला (Molestation) कंटाळून तिने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाउल उचलल्याचे समोर आले आहे.

Advertisement

‘आब्या’मुळे आपण आत्महत्या करत असल्याचे अल्पवयीन मुलीने चिठ्ठीत लिहले आहे. ही चिठ्ठी पोलिसांना आणि नागरिकांना आत्महत्या केलेल्या मुलीच्या जवळ सापडली आहे.

आईवडिलांच्या प्रतिमेला तडा जाऊ नये म्हणून मुलीने टोकाचे पाउल उचलल्याचे समोर आले आहे. ही घटना सायंकाळी साडेपाच च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी (Police) याची गंभीर दखल घेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (Crime) दाखल केला आहे. या प्रकरणी मुलीच्या आईवडिलांनी पोलीस ठाण्यात (Police Station) तक्रार (Complaint) दिली आहे. पोलिसांनी ३ मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement