पुणे : महिला (Women) या सर्वच क्षेत्रात ऍक्टिव्ह असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. पुण्यात (Pune) एका महिलेने चालकाला (Bus Driver) चक्कर आल्यानंतर धाडस दाखवत बस (Bus) चालवत अनेक महिलांचे प्राण प्राण वाचवले आहे.

अनेकदा तुम्ही महिलांनी गाडी चालवतनाचे पहिले असेल. पण एका महिलेने चक्क बस चालत अनेक महिलांचे प्राण वाचवले आहेत आणि चक्कर (Dizziness) आलेल्या चालकाला रुग्णालयातही घेऊन गेली आहे.

योगिता सातव (Yogita Satav) असे धाडस दाखवत बस चे स्टेअरिंग (Steering) हातात घेणाऱ्या महिलेचे नाव आहे.

Advertisement

त्यांचा बस चालवतनाचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे.

महिलांचा ग्रुप पर्यटनासाठी गेला असताना ४० वर्षीय चालकाला अचानक चक्कर आली. त्यानंतर योगिता सातव यांनी धाडस दाखवत धीर धरत बस चे कंट्रोल त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतले.

योगिता सातव यांनी १० किलोमीटर चा प्रवास करत महिलांचे प्राण तर वाचवलेच पण चालकाला देखील रुग्णालयात  (Hospital) दाखल केले आहे.

Advertisement

अनियंत्रित होणारी बस त्यांनी नियंत्रणात ठेऊन धाडसी काम त्यांनी केले आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.