पुणे : महानगरपालिकेच्या (Municipal) सभेत मेट्रोच्या कामावरून (Metro Work) सत्ताधारी आणि विरोधक (Ruling party and opposition) यांच्यामुळे गदारोळ पाहायला मिळाला.

मंगळवारी या गदारोळामुळे महापालिकेची सभा तहकूब करावी लागली. संभाजी पुलावरून (Sambhaji Bridge) म्हणजेच लकडी पुलावरून जाणाऱ्या मेट्रोच्या मार्गामुळे (Metro Route) महापालिकेत विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पोलीस बंदोबस्तात मेट्रोचे काम सुरु करायला सांगितले असल्याचे मेट्रोने स्पष्ट केले आहे.

Advertisement

महापालिका सभेवेळी मानदंडही पळवून नेण्याचाही या वेळी प्रयत्न करण्यात आला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि मनसेच्या नगरसेवकांनी (Corporator) जोरदार घोषणाबाजी करत सभागृहाचे कामकाज बंद पाडले.

या सर्व प्रकारामुळे कामकाज करणे शक्य नसल्याने अखेर महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी ही सभा शेवटी तहकूब केली.

का होतोय विरोध ?

Advertisement

हा मेट्रो मार्ग वनाज ते रामवाडी, डेक्कन जिमखाना येथून नदीपात्रातून जात आहे. संभाजी पुलावरून या मार्गीकेचे गर्डर टाकले जाणार आहेत. याची उंची कमी असल्यामुळे गणपती मिरवणुकींना अडचणी निर्माण होणार आहे.

हे सर्व पाहता गणेश मंडळांनी (Ganesh Mandal) त्याला विरोध केला आहे. ३ म्हन्यांपासून मेट्रोचे कामकाज ठप्प आहे.

या ३ महिन्यांच्या कालावधीत गणेश मंडळांचे प्रतिनिधी, मेट्रो व महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या तीन बैठका झाल्या.

Advertisement

त्यामध्ये विविध पर्यायांची चर्चा झाली. मात्र, त्यासाठी किमान दोन वर्ष जातील, असे स्पष्ट झाल्यानंतर हे काम सुरू करण्याचे अजित पवार यांनी आदेश दिले आहेत.

महापालिकेची सभा सुरु झाल्यावर विरोधकांनी महापौरांच्या आसनापुढे समोर येत जोरदार घोषणाबाजी केली. परंतु महापौरांनी यावर चर्चा करून काहीच साध्य होणार नसल्याचे सांगत ही मागणी फेटाळली आहे.

Advertisement