पुणे – बहुप्रतिक्षित पुणे-सिंगापूर (Pune To Singapore Flight) आंतरराष्ट्रीय विमानसेवेला अखेर हिरवा कंदिल मिळाला असून, पुणेकरांना या सेवेचा मोठा फायदा होणार आहे. 2 डिसेंबर 2022 पासून ही सेवा सुरू होणार आहे. मागील महिन्यात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (jyotiraditya scindia) यांनी पुण्यात आल्यावर पुणेकरांच्या मागणीनुसार 6 ठिकाणी आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आता पुणे- सिंगापूर (Pune To Singapore Flight) ही आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होत आहे.

त्याचबरोबर बँकॉक आणि दोहा या ठिकाणी विमानसेवा सुरु करण्याबाबत देखील आम्ही विचार करतो आहोत, असंही ते म्हणाले होते. दरम्यान, त्यांच्या निर्णयामुळे आता पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे ते सिंगापूर आंतरराष्ट्रीय (Pune To Singapore Flight) विमानसेवा आठवड्यातून चार दिवस असणार आहे. म्हणजेच आठवड्यात सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारीच या सेवेचा पुणेकरांना लाभ घेता येणार आहे.

यापुर्वी पुण्यातून फक्त दुबई, शारजाह येथेच फक्त आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होती. आता सिंगापूर सेवेमुळे आंतरराष्ट्रीय सेवेत वाढ झाली आहे. आता पुणे ते सिंगापूर प्रवास 8 तासात तर सिंगापूर ते पुणे प्रवास 4 तासात पूर्ण होणार आहे.

जाणून घ्या, तिकीट दर

1) 17 हजार 799 रूपये (इकॉनॉमी)
2) 32 हजार 459 रूपये (प्रिमियम इकॉनॉमी)
3) 82 हजार 999 रूपये (बिझनेस क्लास)

दिवसभरात 2 फेर्‍या आणि वेळ

1) पुणे-सिंगापूर – दु.2 वाजून 10 मिनिटे – रात्री 10 वाजून 30 मिनिटे
2) सिंगापूर ते पुणे – स.11 वाजून 50 मिनिटे – दु.3 वाजून 15 मिनिटे