पुणे – सध्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic issue) होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि या त्रासाला आता सामान्य पुणेकर (Punekar) देखील चांगलाच वैतागला आहे. काहीदिवसांपूर्वीच पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (amitabh gupta) आणि मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी शहारात सुरू असलेल्या विविध प्रकल्पाची पाहणी केली.

यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्या सोबत गणेश खिंड रस्ता, पुणे विद्यापीठ चौक, बाणेर, चांदणी चौक, नवले पूल आणि सिंहगड रस्ता परिसरात दोघांनी पाहणी केली. आणि त्याची करणे देखील शोधून काढली.

त्यामुळे आता शहरातील वाहतुक कोंडी (Traffic issue) फोडण्यासाठी आणखी वेगळे प्रयोग होण्याची शक्‍यता आहे. शहरात मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे.

वाहतुक पोलिसांकडून (pune Police) वाहतुक नियमनापेक्षा दंडात्मक कारवाईवर भर देण्यात येत असल्यामुळे त्यावर प्रारंभी मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली होती.

विशेषतः पाऊस, गणेशोत्सव, दिवाळीच्या काळातही वाहतुक कोंडी कायम राहिली होती. त्यातच काही मंत्र्यांनाही वाहतुक कोंडीचा (Traffic issue) फटका बसला होता.

त्यानंतरही वाहतुक पोलिसांकडून उपाययोजना होत नसल्याने अखेर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीच या प्रश्‍नाची गांभीर्याने दखल घेत ठोस उपायोजना करण्यास सुरुवात केली होती.

वाहतुक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांची नियुक्ती, पोलिस ठाण्यांचे पोलिस कर्मचारी चौकात उतरवुन वाहतुक नियमनावर भर देण्यात आला होता.

दरम्यान, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीच रस्त्यावर उतरुन वाहतुक कोंडीची पाहणी करीत महापालिकेला पत्र लिहीले होते. मात्र, काहीदिवसांपूर्वी शहरातील सात पोलिस उपायुक्तांच्या बदल्या झाल्या.

अश्यातच, ‘नव्याने रुजु झालेल्या पोलिस उपायुक्तांना वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे. त्यादृष्टीने सर्व अधिकारी वाहतुक कोंडीची पाहणी करुन निरीक्षणे नोंदवित आहेत.’ असं पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले आहेत.