पुणे – पुणे शहरातील (pune) वाहतूक कोंडी (traffic) ही दिवसागणित वाढतच चाली असून, सामान्य पुणेकर चांगलेच हैराण झाले आहेत. शहरातील सर्वच ठिकाणी गेल्या काही दिवसापासून पुणेकरांना (Punkear) वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. असं असताना दुसरीकडे कोंढवा (Kondhwa) परिसरातील काही मार्गावर काल पासून म्हणजेच, मंगळवार पासून जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती कोंढवा वाहतूक (Kondhwa police) विभागाचे पोलीस उप आयुक्त राहूल श्रीरामे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार… उंड्री चौक ते कडनगर चौक तसेच ज्योती हॉटेल ते पारगेनगर क्रॉसिंग – या दोन मार्गावर सकाळी सहा ते दुपारी 12 पर्यंत तसेच,

सायंकाळी चार पासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत या मार्गावर जड वाहनांना बंदी करण्यात आली असून दुपारी बारा ते सायंकाळी चार पर्यंत जड वाहनांना हे मार्ग खुले राहणार आहेत.

एन.आय.बी.एम रोड ते घुले पाटील चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर, संघरिया सोसायटी, बिशप स्कुल पासून एन.आय.बी.एम रोडकडे जाणऱ्या मार्गावर याबरबरच इशरत बाग.

ऑर्चिड पॅलेस सोसायटी जवळील मार्गावरून एन.आय.बी.एम रोडकडे जाणाऱ्या मार्गावर 24 तास जड वाहनांना वाहतुक बंदी करण्यात आली आहे. याचाच अर्थ या तीनही मार्गावर यापुढे जड वाहनांना प्रवेश मिळणार नाही.

वरील बदलांबाबत नागरिकांच्या काही सुचना किंवा हरकती असतील तर त्या 22 नोव्हेंबर या 14 दिवसांच्या कालावधीत लेखी स्वरुपात पोलीस उपायुक्त वाहतुक नियंत्रण शाखा,

येरवडा पोस्ट ऑफीस,बंगला नं 6 जेल रोड पुणे यांच्या कार्यलयात द्याव्यात. नागरिकांच्या सुचना व हरकतीनुसार पुढे ही योग्य ते बदल करण्यात येतील. असे आवाहन पोलीस उपायुक्त राहूल श्रीरामे यांनी केले आहे.