पुणे : शहरातील हडपसर (Hadapsar) येथे असणाऱ्या रामटेकडी परिक्षा केंद्रावर (Ramtekdi Examination Center) CTET (Central teacher eligibility test) परीक्षेदरम्यान राडा झाला असल्याची माहिती मिळत आहे. विद्यार्थी (Students) आणि परीक्षा आयोजकांमध्ये (Exam organizer) झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आहे.

पुण्यातील (Pune) हडपसर भागातील परीक्षा केंद्रावर (Exam Center) हा सर्व प्रकार घडला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येईल थोडा उशीर झाल्याने आयोजकांनाही त्यांना परीक्षेला आत सोडण्यासाठी नकार दिल्याने हा सर्व प्रकार घडला आहे.

विद्यार्थ्यांना प्रतीक्षा केंद्रात सोडण्यास तेथील आयोजक आणि सुरक्षा रक्षकांनी (Security guard) नकार दिला होता.

Advertisement

त्यामध्ये विद्यार्थी आणि आयोजकांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत (Fighting) झाले असल्याची माहिती मिळत आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षेस येण्यासाठी थोडा उशीर झाला होता. परीक्षा १० वाजता सुरु होणार होती. मात्र तिथे उपस्थित राहण्याची वेळ ही ९.१५ होती. यासाठी काही विद्यार्थ्यांना उशीर झाला होता.

विद्यार्थ्यांना फक्त १ मिनिटाचा उशीर आला होता. तरीही आयोजकांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी गेटची काडी उघडत आतमध्ये प्रवेश केला.

Advertisement

त्यावेळी तिथे असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थी आणि आयोजकांमध्ये वाद झाला आणि याच वादातून हाणामारी झाल्याची माहिती मिळत आहे.