इंडिया टुडे’ मासिकातर्फे दरवर्षी देशातील प्रत्येक शाखेमधील शिक्षणसंस्थांचे सर्वेक्षण करण्यात येते. या सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार सावत्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा माध्यम व संज्ञापन अभ्यास विभागाला देशात चौथ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त झाले आहे. ‘

एमएस टीम प्रणालीचे काैतुक
इंडिया टुडे’ या मासिकाने देशातील शैक्षणिक संस्थांचे सर्वेक्षण केले. त्यात ‘मास कम्युनिकेशन कॉलेज’च्या गटात विभागाने हे स्थान पटकाविले आहे.

कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी विभागाने ‘एमएस टीम प्रणाली’ आत्मसात केली. त्याद्वारे अध्यापन, प्रात्यक्षिक परीक्षा, मूल्यांकन, प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे नव्याने उभारली.

Advertisement

‘विद्यार्थी शिक्षण’ केंद्रस्थानी ठेवून कशा प्रकारे परीक्षा घेण्यात आल्या, यावरही या मासिकात प्रकाश टाकला आहे. विद्यार्थ्यांना या नव्या शिक्षण पद्धतीने शिकताना काय अनुभव आले, हेदेखील या सर्वेक्षणा दरम्यान जाणून घेतले आहे.

”विभागाला विशेष बनविण्यासाठी शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. कोरोनाच्या काळातही विभागाला चौथ्या क्रमांकाचे स्थान टिकवून ठेवण्यात यश आले आहे,” असे या विभागाच्या प्रमुखांनी सांगितले.

Advertisement