पुणे – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस (Rain) पुन्हा एकदा जोर धरू लागला होता. यामुळे ऐनवेळी पाऊस (Rain) पडत असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण (Atmosphere) निर्माण झाले आहे. अचानक येणाऱ्या या पावसामुळे नागरिक सुद्धा चांगलेच हैराण झाले होते. मात्र, आता वातावरणात बदल झाला असून, दिवाळीपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातून मोसमी वारे (Weather) वेगाने परतीचा प्रवास करत आहेत. त्यामुळे आता पावसाने निरोप घेताच राज्यात हुडहुडी वाढली आहे.

राज्याच्या अनेक भागात सध्या थंडी (Weather) वाढल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची (Temperature) नोंद पुण्यात (Pune) झाली आहे. पुण्यात १३.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे.

गुरुवारी (३ नोव्हेंबर) पुण्यात राज्यातील नीचांकी १३.१ अंश किमान तापमानाची नोंद झाली. पुण्यात ३० ऑक्टोबरलाही सर्वात नीचांकी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची (Weather) नोंद झाली होती. त्यापूर्वी औरंगाबादमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती.

मात्र, येणाऱ्या तीन ते चार दिवस पावसाची शक्यता असल्याने महाराष्ट्रात या कालावधीत तापमानात (Temperature) पुन्हा बदल होण्याचा अंदाज आहे.

राज्यात उन्हाचा पारा काही प्रमाणात वाढण्याची आणि गारव्यात किंचित घट होण्याची शक्यता आहे. राज्यात मात्र कुठेही पाऊस होणार नसून, हवामान (Weather) प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.

ऑक्टोबरच्या २३ तारखेनंतर राज्याच्या सर्व भागातून पावसाळी स्थिती दूर होऊन तापमानात एकदमच घट झाली होती. ही घट सध्याही कायम असून, बहुतांश भागात रात्री गारवा जाणवतो आहे. सर्वत्र रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या खाली आहे.

त्यामुळे बहुतांश भागात थंडी जाणवते आहे. मात्र, दिवसा निरभ्र आकाशाची स्थिती असल्याने दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा सर्वत्र ३० ते ३२ अंशांच्या आसपास आहे. त्यामुळे हलका चटका जाणवतो आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.