पुणे – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस (Rain) पुन्हा एकदा जोर धरू लागला होता. यामुळे ऐनवेळी पाऊस (Rain) पडत असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण (Atmosphere) निर्माण झाले आहे. वातावरणात बदल झाला असून, राज्यातील काही भागांमध्ये वेगवान वाऱ्यासह पावसाची (Rain) जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. अचानक येणाऱ्या या पावसामुळे नागरिक सुद्धा चांगलेच हैराण झाले आहे.

अश्यातच पुणे (Pune) शहरात झालेल्या मुसळधार पाऊसामुळे (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं होतं. पुण्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती देखील यामुळे निर्माण झाल्याचे यावेळी दिसून आले.

दरम्यान, गेल्या आठवडय़ापासून राज्यात मुसळधार पाऊस होत असला, तरी दिवाळीच्या कालावधीत पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. राज्यातून मोसमी वारे (Weather) वेगाने परतीचा प्रवास करत आहेत.

मात्र, मोसमी वारे माघारी फिरताच राज्यातील हवामानात झपाटय़ाने (Weather) बदल होत आहे. रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाली असून, राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.

प्रचंड उकाडा आणि उन्हाच्या तीव्र चटक्यांपासून सुटका झाली असली, तरी थंडीच्या कालावधीवर मात्र परिणाम झाला आहे. यंदाही थंडीच्या आगमनासाठी ऑक्टोबरच्या शेवटाची वाट पाहावी लागली.

त्यामुळे सध्या राज्यभर गारवा अवतरला असून, अगदी गेल्याच आठवड्यात रेनकोट, छत्री जवळ ठेवणाऱ्या नागरिकांना आता स्वेटर, कानटोपी बाळगावी लागत आहे.

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आठवडाभर थंडीची स्थिती कायम राहणार आहे. मात्र, तापमानात काही प्रमाणात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
पुणे शहरामध्ये रात्रीच्या किमान तापमानात शनिवारी (२९ ऑक्टोबर) आणखी घट नोंदविण्यात आली. शहरात हंगामातील नीचांकी १३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानात घट होत असताना तापमानाचा हंगामातील नीचांकी कायम असल्याने रात्रीच्या गारव्यात वाढ झाली आहे.