पुणे – गेल्या काहीदिवसांपासून राज्यात पाऊस (Rain) पुन्हा एकदा जोर धरू लागला. यामुळे ऐनवेळी पाऊस (Rain) पडत असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण (Atmosphere) निर्माण झाले आहे. वातावरणात बदल झाला असून, राज्यातील काही भागांमध्ये वेगवान वाऱ्यासह पावसाची (Rain) जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. अचानक येणाऱ्या या पावसामुळे नागरिक सुद्धा चांगलेच हैराण झाले आहे.

अश्यातच पुणे (Pune) शहरात झालेल्या मुसळधार पाऊसामुळे (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं होतं. पुण्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती देखील यामुळे निर्माण झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, गेल्या आठवडय़ापासून राज्यात मुसळधार पाऊस होत असला, तरी दिवाळीच्या कालावधीत पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातून मोसमी वारे (Weather) वेगाने परतीचा प्रवास करत आहेत.

मात्र, मोसमी वारे माघारी फिरताच राज्यातील हवामानात झपाटय़ाने (Weather) बदल होत आहे. रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाली असून, राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.

निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानाच्या स्थितीमुळे संपूर्ण राज्यामध्ये रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन गारवा निर्माण झाला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात सर्वाधिक घट झाली आहे. राज्यातील गारव्याची ही स्थिती ऑक्टोबर अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

संपूर्ण राज्यातून २३ ऑक्टोबरला मोसमी पाऊस माघारी फिरल्यानंतर लगेचच आकाशाची स्थिती निरभ्र झाली. त्याचप्रमाणे हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होऊन कोरडे हवामान तयार झाले.

रात्रीही आकाश निरभ्र राहत असल्याने किमान तापमानात झपाट्याने मोठी घट झाली. पावसाळी वातावरण असताना राज्यात सर्व ठिकाणी रात्रीचे किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस दरम्यान होते. त्यामुळे रात्री काहीसा उकडा जाणवत होता.

मात्र, पाऊस माघारी फिरताच २३ सप्टेंबरपासूनच सर्वत्र किमान तापमानात मोठी घट होऊन ते सरासरी खाली आले. त्यामुळे आता संपूर्ण राज्यात थंडी अवतरली आहे.