पुणे – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस (Rain) पुन्हा एकदा जोर धरू लागला होता. अचानक येणाऱ्या या पावसामुळे नागरिक सुद्धा चांगलेच हैराण झाले होते. मात्र, आता वातावरणात (Weather) बदल झाला आहे. दिवाळीपासून पावसाने विश्रांती घेतली असून राज्यात हुडहुडी वाढली आहे. राज्याच्या अनेक भागात सध्या थंडी (Weather) वाढल्याचे चित्र दिसत आहे.

अश्यातच पुणे शहर आणि परिसरातील तापमानात झपाट्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. एकाच दिवसात रात्रीच्या किमान तापमानात ३ अंश सेल्सिअसने घट होऊन गुरुवारी शहरात १२.८ अंश सेल्सिअस (Pune Temperature) किमान तापमानाची नोंद झाली.

त्यामुळे यंदाच्या हंगामात पुण्यात तिसऱ्यांदा राज्यात नीचांकी तापमान (Pune Temperature) नोंदविले गेले. हवामान विभागाने या बद्दल माहिती दिली आहे. पुण्यात पुढील काही दिवस हवामानातील हा चढ-उतार असाच राहणार आहेत.

त्याचप्रमाणे दोन दिवसांनंतर शहरात अंशत: ढगाळ वातावरण (Pune Temperature) तयार होण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. पुणे शहरामध्ये ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमानात घट होऊन थंडी अवतरली.

त्यानंतर रात्रीचे किमान तापमान (Pune Temperature) सातत्याने १३ ते १४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहिले आहे. ईशान्य मोसमी वाऱ्यांचा दक्षिणेकडे प्रभाव सुरू झाल्यानंतर राज्यात काही भागांत अंशत: ढगाळ स्थिती निर्माण होत आहे.

त्याचा परिणाम पुणे आणि परिसरावरही काही प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे रात्रीच्या किमान तापमानात काही प्रमाणात चढ-उतार होत आहेत. पुणे शहरात बुधवारी (९ नोव्हेंबर) किमान तापमान थेट १५.८ अंशांवर पोहोचले (Pune Temperature) होते.

मात्र, एकाच दिवसात त्यात तीन अंशांनी घट झाली. त्यामुळे गुरुवारी (१० नोव्हेंबर) पुण्यात १२.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान राज्यातील नीचांकी तापमान ठरले. दिवसाच्या कमाल तापमानातही घट होऊन ते ३०.६ अंशांवर आले आहे.