पुणे – दिवाळीपासून पावसाने विश्रांती घेतली असून, राज्यातून मोसमी वारे (Weather) वेगाने परत गेले आहेत. त्यामुळे आता पावसाने निरोप घेताच राज्यात हुडहुडी वाढली आहे. आता वातावरणात बदल झाला असून, राज्याच्या अनेक भागात सध्या थंडी वाढल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची (Temperature) नोंद पुण्यात (Pune) झाली आहे.

सध्या पुण्यात 12.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे. सरासरीच्या तुलनेत हे तापमान 3.2 अंशानं घटलं आहे. त्यामुळे पुणे शहरात थंडीचा जोर वाढल्याचं मिळत आहे.

मोसमी वारे माघारी फिरताच राज्यातील हवामानात झपाटय़ाने (Weather) बदल होत आहे. रात्रीच्या किमान तापमानात (Temperature) मोठी घट झाली असून, राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.

निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानाच्या स्थितीमुळे संपूर्ण राज्यामध्ये रात्रीच्या किमान तापमानात (Temperature) घट होऊन गारवा निर्माण झाला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात सर्वाधिक घट झाली आहे. राज्यातील गारव्याची ही स्थिती ऑक्टोबर अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

त्यातच राज्यातील शुक्रवारी यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची (Temperature) नोंद झाली आहे. खरंतर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध आहे. मात्र, महाबळेश्वर पेक्षाही राज्यातील जळगाव शहरात नीचांकी तापमान होते.

जळगावमध्ये काल 10.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर पुण्यात 11.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे. त्या खालोखाल नाशिक आणि पुण्याच्या तापमानाची नोंद समोर आली आहे.

नाशिक आणि पुण्यात 11.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. त्यानंतर अहमदनगर मध्ये 11.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

आणि मग त्यानंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये 12 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाल्याचे समोर आले आहे.