पुणे – गेल्या महिन्यात राज्यात मुसळधार (weather) पाऊस होत असल्याचं पाहायला मिळालं होतं, अचानक येणाऱ्या या पावसामुळे नागरिक (weather) सुद्धा चांगलेच हैराण झाले होते. मात्र, येणं दिवाळीच्या कालावधीत पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून आले. तेव्हा पासून राज्यातील वातावरणाची (weather) स्थिती बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे.आणि स्थिती पाहता नोव्हेंबरअखेपर्यंत यंदाही हवामानाचे (weather) हेलकावे अनुभवण्यास मिळणार आहेत.

नोव्हेंबरच्या सुरुवातीस असलेली थंडी आता कमी होऊ लागली असून, अनेक भागांत अंशत: ढगाळ वातावरण (weather) तयार झाले आहे. त्यातच चार ते पाच दिवसांत दक्षिण कोकणात तुरळ ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

या महिन्यात पुढील काळात वातावरणाच्या (weather) स्थितीत सातत्याने बदल होणार असल्याने ऊन, थंडी आणि पाऊस आदी तीनही ऋतूंची अनुभूती मिळण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, 09 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत ते तामिळनाडू-पुडुचेरी किनारपट्टीच्या दिशेने वायव्येकडे सरकण्याची दाट शक्यता आहे.

त्याच्या प्रभावाखाली महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण-मध्य (IMD) भागांमध्ये (पुण्यासह) ओलावा आधीच सुरू झाला आहे. येत्या काही दिवसांत पुण्यात अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

परिणामी काही दिवस रात्री/किमान तापमानात किरकोळ वाढ होण्याची शक्यता आहे. असे डॉ. अनुपम कश्यपी ( प्रमुख, हवामान अंदाज, IMD) यांनी सांगितलं आहे.

तापमानातील बदल कशामुळे?

ऑक्टोबरच्या शेवटी पावसाळी वातावरण दूर होऊन निरभ्र आकाश झाल्याने गारवा निर्माण झाला. नोव्हेंबरच्या सुरुवातीला कोरडय़ा स्थितीमुळे सर्वत्र थंडी अवतरली.

यंदा र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांना परतण्यास उशीर झाला आणि ईशान्य मोसमी वारे दक्षिणेकडे सक्रिय होण्यासही विलंब झाला. सध्या दक्षिणेकडे हे वारे सक्रिय आहेत. त्यामुळे दक्षिणेकडील तमिळनाडू, केरळ आणि परिसरात पाऊस होत आहेत.

उत्तरेकडेही चक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे. परिणामी राज्यात अंशत: ढगाळ स्थिती आहे. त्यामुळे थंडी कमी होत आहे. याच स्थितीतून दक्षिण कोकणात तुरळक भागांत पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.