पुणे – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस (Rain) पुन्हा एकदा जोर धरू लागला होता. यामुळे ऐनवेळी पाऊस (Rain) पडत असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण (Atmosphere) निर्माण झाले आहे. अचानक येणाऱ्या या पावसामुळे नागरिक सुद्धा चांगलेच हैराण झाले होते. मात्र, आता वातावरणात बदल झाला असून, दिवाळीपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातून मोसमी वारे (Weather) वेगाने परतीचा प्रवास करत आहेत. त्यामुळे आता पावसाने निरोप घेताच राज्यात हुडहुडी वाढली आहे.

राज्याच्या अनेक भागात सध्या थंडी वाढल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची (Temperature) नोंद पुण्यात (Pune) झाली आहे. पुण्यात 12.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे. सरासरीच्या तुलनेत हे तापमान 3.2 अंशानं घटलं आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधून येणारे थंड वारे आणि हिमालयीन पर्वत रांगांवर होत असलेली बर्फवृष्टी याचा एकत्रित परिणाम होऊन उत्तर भारतापाठोपाठ महाराष्ट्रातील किमान तापमान कमी झालं आहे.

महाराष्ट्रातही परतीच्या पाऊस माघारी फिरला आहे. त्यामुळं सध्या राज्यात आकाश निरभ्र झालं आहे. याचा परिणाम म्हणून तापमानात घट झाली असून, थंडीची चाहूल लागली आहे.

राज्यात गारठा वाढला आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर चांगला आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यात थंडीमुळं हुडहुडी वाढली आहे. राज्यातील गारव्याची ही स्थिती ऑक्टोबर अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान :

 • पुणे – 12.6
 • लोहगाव – 14.7
 • जळगाव – 14
 • कोल्हापूर – 17.7
 • महाबळेश्वर – 13.8
 • नाशिक – 13.3
 • सांगली – 17.2
 • सातारा – 14.3
 • सोलापूर – 16.1
 • मुंबई – 24
 • सांताक्रूझ – 20.5