पुणे – नुकतीच उन्हाळ्याची चाहूल लागली असताना पाऊस (Rain) पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. यामुळे ऐनवेळी पाऊस (Rain) पडणार असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण (Atmosphere) निर्माण झाले आहे. वातावरणात बदल झाला असून, गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील काही भागांमध्ये वेगवान वाऱ्यासह पावसाची (Rain) जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. अचानक येणाऱ्या या पावसामुळे नागरिक सुद्धा चांगलेच हैराण झाले आहे.

सोमवार आणि मंगळवारी रात्री पुण्यात (Pune rain) देखील मुसळधार पाऊस झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात अडकलेल्या एकूण 12 जणांची सुटका केली. मात्र, इतर घटनांत दोघांचा मृत्यू झाला.

सोमवारी रात्री साडेअकरापर्यंत दीड तासात शिवाजीनगरात 104 मिमी पावसाची नोंद झाली. मगरपट्टा 111 मिमी आणि पाषाणमध्ये 94 मिमी पाऊस झाला. पुणे स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी (Pune rain) घुसल्याने प्रवाशांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

आज आणि उद्या (शुक्रवार) पुन्हा एकदा पुण्यात दुपार दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान (Weather Update) खात्याने दिला आहे. बुधवारी दिवसभर पुणे शहर व परिसरातील आकाश बहुतांश निरभ्र होते.

पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी परतीच्या पावसाचा तडाखा सुरू असून, पुण्यातही शुक्रवारपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात (Weather Update) आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घ्यावी असं देखील हवामान खात्याने सांगितलं आहे.

उर्वरित राज्यात पावसाचा जोर (Weather Update) ओसरण्याची चिन्हे असून, तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. उत्तर अरबी समुद्रापासून तमिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती, तसेच त्यापासून केरळ किनाऱ्यापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. गुरुवारी (ता. 20) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली वायव्येकडे सरकताना शनिवारपर्यंत (ता. 22) आणखी तीव्र होईल. असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.