पुणे : शहर आणि परिसरात पिस्तूल (Pistul) खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. पिस्तूल खरेदी (Pistol Buy) केल्यानंतर त्याच्या परवान्याची नोंद मात्र पोलिसांकडे (Police) केली जात नाही. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchawad) शहरात याचे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसत आहे. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय (Pimpri-Chinchwad Police Commissionerate) सुरु होण्यापूर्वी शस्त्र परवाने घेतले. त्यामुळे पोलिसांकडे अनेकांच्या शस्त्र परवान्यांची नोंद नाही.

अनेक लोकप्रतिनिधींनी शस्त्र (Weapon) खरेदी केली आहेत पण, त्या शस्त्राच्या परवान्याची नोंद मात्र पोलीस आयुक्तलयात केलेली नाही. शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या (Crime Rate) प्रमाणामुळे हे सर्व घडत असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेली काही दिवस गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हत्या, अपहरण यांसारखे गुन्हे घडत आहेत. स्वरक्षणासाठी पिस्तूल परवान्याच्या मागणी मध्ये वाढ होत आहे.

पिस्तूल परवान्यांमध्ये राजकीय नेते, उद्योजक, डॉक्टर्ससह, तरूणांकडून मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असल्याचे दिसत आहे. शहरातील नगरसेवक, आमदार , खासदार, यांच्याकडेही पिस्तूल परवाने आहेत.

शहरात पिस्तूल परवाने असल्याचे अनेक जण आहेत. या परवान्याच्या अधिक विनापरवाना पिस्तूल वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जुन्या शस्त्रांच्या परवान्याची नोंद पोलीस ठाण्यात अनेकांनी केलेली नाही.

Advertisement