मुंबई – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी नुकतंच सांगितले की, कन्नड चित्रपट अभिनेता ‘पुनीत राजकुमार’ (Puneeth Rajkumar) यांना 1 नोव्हेंबर रोजी राज्य स्थापना दिनी ‘कर्नाटक राज्योत्सव’ निमित्त ‘कर्नाटक रत्न’ (Karnataka Ratna Award) पुरस्कार मरणोत्तर प्रदान केला जाईल. गेल्या वर्षी या अभिनेत्याचे (Puneeth Rajkumar) निधन झाले. राज्याच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित होणारे ते 10 वे व्यक्ती असतील.

मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, ‘पुनीत राजकुमार’ (Puneeth Rajkumar) यांना कर्नाटक रत्न पुरस्कार (Karnataka Ratna Award) 1 नोव्हेंबरला देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, त्याची तयारी करण्यासाठी आम्ही एक समिती स्थापन करू,

ज्यामध्ये राजकुमार (Puneeth Rajkumar) यांच्या कुटुंबीयांचाही समावेश असेल, ते पूर्ण सन्मानाने आयोजित केले जाईल.’ असं ते (Basavaraj Bommai) म्हणाले.

या वर्षीच्या फ्लॉवर शोमध्ये कन्नड अभिनेता डॉ राजकुमार आणि त्यांचा मुलगा आणि अभिनेता पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) यांना विशेष पुष्पांजली वाहण्यात आली.

कन्नड चित्रपटसृष्टीचा एक चमकता तारा मानला जाणारा पुनीत हा कन्नड अभिनेता डॉ राजकुमार यांच्या पाच मुलांपैकी सर्वात लहान होता. 29 ऑक्टोबर रोजी वयाच्या 46 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स (KFCC) तर्फे फिल्म अ‍ॅक्टर्स अँड टेक्निशियन असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने पुनीत राजकुमार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित

“पुनीता नमना” कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिवंगत अभिनेत्याला पुरस्कार जाहीर केला होता. 2009 मध्ये डॉ वीरेंद्र हेगडे यांना सामाजिक सेवेसाठी कर्नाटक रत्न शेवटचा देण्यात आला होता.

‘या’ सेलिब्रिटींना कर्नाटक रत्न पुरस्कार मिळाला…

विशेष बाब म्हणजे पुनीत राजकुमारचे दिवंगत वडील राजकुमार हे कवी कुवेंपू यांच्यासोबत 1992 मध्ये कर्नाटक रत्न पुरस्कार प्राप्त करणार्‍या पहिल्या लोकांमध्ये आहेत.

एस निजलिंगप्पा (राजकारण), सीएनआर राव (विज्ञान), डॉ देवीप्रसाद शेट्टी (वैद्यक), भीमसेन जोशी (संगीत),

शिवकुमार स्वामीजी (समाजसेवा) आणि डॉ जे जावरे गौडा (शिक्षण आणि साहित्य) या पुरस्काराने सन्मानित इतर व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे.