Pune : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सार्वजनिक बससेवा पीएमपीएलकडून (PMPL) पुरवली जाते. पुण्यातून इतर ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीसाठी रेल्वे, विमानसेवा, राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस ही प्रमुख साधनं आहेत. तर, पुणे आणि पिंपरी चिचंवडमधील नागरिकांना पीएमपीएलकडून बससेवा पुरवली जाते.

कॅब सर्व्हिस- पीएमपीएल आता पुढचं पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. पुण्यातील पीएमपीएल आता बस सेवेबरोबरच कॅब सर्व्हिस (PMPL Cab Service) देखील सुरू करणार आहे. इतकंच नाही तर PMPL ची सेवा अधिकाधिक स्मार्ट आणि पर्यावरण पूरक बनवण्याच्या दृष्टिकोनातून ई बसेसची (E-buses) संख्या वाढवणे, पब्लिक चार्जिंग स्टेशन्स उभारणे, तिकीट बुकिंग साठी मोबाईल अँप विकसित करणे अशा अनेक गोष्टी येत्या काही काळात केल्या जाणार आहेत.

Advertisement

पीएमपीएल तर्फे सुरु केली जाणारी ई-कॅब सेवा ही इतर कॅब सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या तुलनेत आणि रिक्षाच्या तुलनेत ही सेवा स्वस्त असेल, असा दावा पीएमपीएलकडून करण्यात आला आहे. पुणेकरांच्या खिशावर पडत असलेला टॅन कमी करणे. पुण्यातले प्रदुषण कमी करणे असे अनेक उद्देश या PMPL च्या योजनेत आहेत.

यामुळे पुण्यातलं राहणीमानही सुधारण्यास मदत होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील परिवहन सेवेच्या माध्यमातून ई-कॅबद्वारे प्रवाशांना सेवा देण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. विमानतळ, एसटी, रेल्वे स्थानक तसेच बाजारपेठेत जाण्यासाठी या कॅब प्रवाशांना उपलब्ध असतील, अशी माहिती मिळत आहेत.

या नवीन सेवा सुरु होणार- या ई बस चार्ज करण्यासाठी पुणे महापालिका स्वतंत्र प्लॅन आखत आहेत. पुणे महापालिकेद्वारे चार्जिंगच्या सोयीसाठी 7 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

Advertisement

500 नवीन ई बसेसही पीएमपीएलच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. या बसेसचे वेळापत्रक तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील ॲपवर कळणार अशी व्यवस्था पालिकेकडून करण्यात येत आहे, एवढेच नाही तर तिकीटही तुम्हाला मोबाईलवर काढता येणार आहे.