उसने पैसे मागितल्याच्या आरोपावरून एकाचा डोक्यात दगड घालून खून करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने शुक्रवारी (दि. २८) सुनावली. तानाजी बाबूराव पांढरे (वय ४५, रा. सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. बसवराज (वय ३५) असे खून झालेल्याचे नाव आहे.

सचिन हनुमंत अलगुडे (वय २८) याने याबाबत फिर्याद दिली आहे. १३ जुलै २०१८ रोजी शिवाजीनगर रेल्वे स्टेशन पंप हाऊससमोर ही घटना घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील ॲड. रमेश घोरपडे यांनी दहा साक्षीदार तपासले.

सहायक पोलीस निरीक्षक अमर कदम यांनी या प्रकरणाचा तपास केला. तानाजी व बसवराज दोघेही फिर्यादीच्या अलगुडे यांच्या वडापावच्या गाडीवर काम करत होते. तानाजीने बसवराज याच्याकडून ५०० रुपये उसने घेतले होते.

Advertisement

हे पैसे परत देण्यासाठी तगादा लावल्याच्या कारणावरून तानाजीने हा खून केला. खटल्यातील दोन्ही पक्षांच्या बाजू, साक्षी व साक्षीदारांचे जबाब झाल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. सोनवणे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.