मुंबई : साऊथ चित्रपट (South film) हे सध्या खूप चर्चेत आहेत. या सिनेमामधील डायलॉग (Dialogue), ऍक्टिंग (Acting), गाणी (Songs) सगळेच प्रेक्षकांना भुरळ पाडत आहे. परंतु हे सिनेमे हिट करण्यामागे जितके अभिनेता आणि अभिनेत्री, डायरेक्टरचे कष्ट आहेत. तितकेच डबिंग अर्टिस्टचे (Dubbing artist) देखील आहेत.

साऊथ चित्रपट हे वेगवेगळ्या भाषेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डबिंग करुन सिनेमे पुन्हा रिलिज केले जातात. आणि त्यामुळे चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत असतो.

साऊथ चित्रपटांमुळे बॉलीवूडचा (Bollywood) चाहतावर्गही कमी होत आहे. एक काळ असा होता ही जेथे सगळे लोक बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी खूप मेहनत घ्यायचे.

Advertisement

परंतु साऊथ सिनेमा इंडस्ट्रीने आता तो दर्जा मिळवला आहे. ज्यामध्ये आता बॉलिवूडमधील सेलिब्रिटी देखील उतरले आहेत.

जाणून घेऊयात बॉलीवूडचे कोणकोणते डबिंग अर्टिस्ट आहेत, की त्यांचा साऊथ चित्रपटांना उंच शिखरावर पोहोचवण्यामागे महत्वाचा वाटा आहे.

श्रेयस तळपदे (Shreyas Talpade)

Advertisement

‘पुष्पा : द राइज’ हा चित्रपट जवळ-जवळ सगळ्यांनीच पाहिला असेल. अल्लू अर्जुनने बॉक्स ऑफिसवर तसेच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. श्रेयस तळपदेने ‘पुष्पा’च्या हिंदी आवृत्तीत अल्लू अर्जुनला आवाज दिला आहे. श्रेयस तळपदे हा एक उत्तम अभिनेता तर आहेच पण तो एक चांगला डबिंग कलाकार देखील आहे.

शरद केळकर (Sharad Kelkar)

हिंदीत रिलीज झालेल्या बाहुबलीमधील प्रभासच्या व्यक्तिरेखेला शरद केळकरने आपला आवाज दिला आहे. शरद केळकर हा उत्तम डबिंग कलाकार आहेत. त्याने केवळ दक्षिणेतच नाही तर अनेक हॉलिवूड चित्रपटांच्या हिंदी डबमध्येही आपला आवाज दिला आहे.

Advertisement

संकेत म्हात्रे (Sanket Mhatre)

संकेत म्हात्रची भारतातील सर्वोत्कृष्ट व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आणि डबिंग आर्टिस्टमध्ये निवड केली जाते. त्याने अल्लू अर्जुन, महेश बाबू आणि ज्युनियर एनटीआरसह अनेक दाक्षिणात्य स्टार्सचा या यादीत समावेश आहे.

विनोद कुलकर्णी (Vinod Kulkarni)

Advertisement

दक्षिणेतील दिग्गज कॉमेडियन आणि अभिनेते ब्रह्मानंदम यांची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.विद्रोही, कंदिरिगा, दोसुकेल्था, आर्य 2 आणि पॉवर यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी विनोदी ब्रह्मानंदमसाठी अनेकदा आवाज दिला आहे आणि त्यांच्या कॉमेडीला हिंदीतही जिवंत ठेवलं आहे.