मुंबई : अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa the rise) या चित्रपटातील गाणी, डायलॉग्स खूप प्रसिद्ध झाले आहेत. मात्र गुजरातमध्ये पुष्पाचा वेगळाच ट्रेंड (Trends) चालू आहे.

एक व्हिडिओमध्ये समोर आले आहे की, पुष्पा चित्रपटाच्या पोस्टरसह छापलेल्या साड्या गुजरातमधील (Gujarat) सुरतमध्ये (Surat) दिसल्या आहेत. चरणजीत क्रिएशन्स (Charanjit Creations) या स्थानिक दुकानाने बनवलेली अनोखी साडी शहरात चर्चेचा विषय बनली आहे.

पुष्पा चित्रपटातील वेगवेगळे पोस्टर वापरून साडी बनवण्याची कल्पना मालक चरणपाल सिंग यांनी मांडली होती, ज्यांनी सोशल मीडियावर छापील साड्यांचे अनेक नमुने शेअर केले होते जे व्हायरल झाले होते.

Advertisement

त्यानंतर या मालकाच्या व्हायरल व्हिडिओमुळे काही वेळातच, अनेक ग्राहकांनी दुकानात गर्दी केली आणि मालकाला देशभरातील कापड व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आली आहे.

राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडसह प्रमुख राज्यांतील लोक या साडीला ‘पुष्पा’ साडी म्हणत ऑर्डर करत आहेत.जेव्हा महिलांनी ही साडी पाहिली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला होता.

त्यामुळेच आता या साडीला महिलांमध्ये मोठी मागणी आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर टोटली अल्लू अर्जुन (TeamTAFC) या अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Advertisement

दरम्यान पुष्पा चित्रपटातील सेलिब्रिटीच नाही तर सामान्य लोकांनीही श्रीवल्ली आणि सामी-सामीच्या गाण्यांवर इन्स्टाग्राम रील्स व्हिडिओ बनवले आहेत. हा चित्रपट गाण्यांपासून ते संवादांपर्यंत सर्वच बाबतीत शिखरावर पोहोचला आहे.

 

Advertisement