ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

कोरोनाच्या बनावट औषधांचा पुरवठा करणारा चर्तुभुज

कोरोनाच्या काळात मागणी असलेल्या आैषधांचा विचार करून, तशी बनावट आैषधे उत्पादित करण्यात आली. त्यांचा पुरवठा वेगवेळ्या राज्यांत करून, रुग्णांच्या जीविताशी खेळ करणा-याला पोलिसांनी गजाआड केले आहे.

हिमाचल प्रदेशात बनावट औषधांचा कारखाना

देशभरात कोरोनामुळे मोठ्या संख्येत नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. त्याचवेळी काही जण मानवतेला काळिमा फासण्याचे कामही करत आहेत.

कोरोनाच्या उपचारात प्रभावीपणे वापरल्या जाणा-या औषधांसह फेविपिरावीर गोळ्यांच्या बनावट मालाचा पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

कोरोना काळात अँटी-व्हायरल फेवीपिरावीर गोळ्यांसह इतर औषधांची मागणी जोरात होती. त्या काळात या व्यापाऱ्याने हिमाचल प्रदेशमध्ये बनावट फार्मा कंपनी तयार केली.

खोटी कागदपत्र तयार करून बोगस औषधांचा पुरवठा केला. लोकांच्या आयुष्याशी खेळत कोट्यवधींची कमाई करण्यात तो व्यस्त होता.

बनावट औषधांचा देशभर पुरवठा

मुंबई पोलिसांनी अटक केलेला हा व्यापारी कोरोना काळात झालेल्या हजारो मृत्युंसाठी अप्रत्यक्षरित्या जबाबदार आहे.

मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला सुदीप मुखर्जी हा केमिकल अभियंता असून व्यावसायिक आहे.

त्याने कोरोना उपचारासाठी प्रभावीपणे वापरल्या जाणाऱ्या फेविपिरावीर गोळ्यांसह अनेक औषध बनवण्याचे बनावट कारखाने हिमाचल प्रदेशात तयार केले होते. तिथून हे बनावट औषध तयार करून देशभरात पुरवले जात असल्याचे समोर आले आहे.

ऑनलाईन विक्रीचे जाळे

आरोपीने बनावट कंपनी, बनावट परवाना, बनावट वितरक आणि कोरोनावरील उपचारासाठी बनावट फेवीपिरावीर गोळ्या आणि इतर आवश्यक औषधे तयार केली.

ही औषधं तो मुंबई, दिल्ली, राजस्थानसह देशभरात वेगवेगळ्या औषधांच्या दुकानात विक्री करत होता. एवढंच नव्हे तर ही बनावट औषधं आॅनलाईनसुद्धा विकली जात होती.

मुंबईतील औषध बाजारपेठेवर छापा

एक कन्साइनमेंट दक्षिण मुंबईच्या औषध बाजारपेठेतही पोहोचली होती. तेथून फेविपिरावीर गोळ्या, हायड्रोक्लोरोक्विनसह अनेक औषधे अनेक नामांकित रुग्णालयात पोहोचवण्यात आली.

याची माहिती मिळताच अन्न आणि औषध विभागाने छापा टाकला. बनावट औषधांचा माल जप्त करण्यात आला. तेव्हापासून सुदीप मुखर्जींचा काळा व्यवसाय समोर आला.

कोट्यवधींची कमाई

मूळ फेवीपिरावीर गोळ्या, हायड्रोक्लोरोक्विन सारखी औषधे कोरोनाच्या उपचारादरम्यान एक प्रभावी औषध आहे. मध्यम स्तरावर संक्रमित रुग्ण या औषधांच्या डोसच्या वापरामुळे बरे होतात.

म्हणूनच या प्रकरणात आरोपी सुदीप मुखर्जीने या औषधाच्या पुरवठ्याशी संबंधित संपूर्ण बनावट सेटअप तयार केले आणि त्याचा पुरवठा देशभर सुरू करून कोट्यावधी रुपये कमवले.

बनावट औषधांमध्ये काय होतं ?

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार जप्त केलेली औषधांची खेप म्हणजे केवळ रासायनिक घटकांचे मिश्रण आहे. ज्याचा कोरोना उपचारात काही उपयोग नव्हता.

महाराष्ट्र एफडीए आणि मुंबई पोलिसांच्या तपासणीनुसार आरोपी सुदीप मुखर्जी यांनी कोरोनाच्या नावावर फसवणुकीचा व्यवसाय चालवण्यासाठी हिमाचल प्रदेशात मेसर्स मॅक्स रिलीफ हेल्थकेअर नावाची कंपनी स्थापन केली, पण प्रत्यक्षात सदर कंपनी राज्यात अस्तित्वात नाही.

 

You might also like
2 li