मुंबई – सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Assembly Session) सुरु आहे. मात्र, आजचं कामकाज सुरु होण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये (Oppositions) जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. हा वाद इतका वाढला कि नंतर विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये धक्काबुक्की करत आई-बहिणींवरून शिवीगाळ देखील करण्यात आली आहे. सध्या हा वादाचा व्हिडिओ (video) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पावसाळी अधिवेशन (Monsoon Assembly Session) सुरू झाल्यापासून विरोधी पक्षातील नेते विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून जोरदार आंदोलन करत आहेत.

’50 खोके, एकदम ओक्के’ यासारख्या घोषणा देऊन महाविकास आघाडीनं विधानसभा परिसर दणाणून सोडला आहे. यानंतर आज सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीदेखील याच ठिकाणी आंदोलन केलं आहे.

त्यांनी करोना काळात झालेल्या भ्रष्टाचारावरून महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे. यावेळी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले आणि एकच राडा झाला.

यावेळी प्रचंड गोधळाचं वातावरण निर्माण झालं. सत्ताधारी पक्षानेदेखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. लवासातील खोके एकदम ओके! अश्या घोषणा सत्ताधाऱ्यांनीही दिल्या.

दरम्यान, याबाबत अधिक माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटातील आमदारांनी आम्हाला धक्काबुक्की करत आई-बहिणींवरून शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यावेळी ते माध्यमांशी संवाद साधत होते. आज पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Assembly Session) पाचवा दिवस आहे. गेले चार दिवस वादळी ठरले आहेत.

विविध प्रश्न उपस्थित करून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना तोडीसतोड प्रत्युत्तर देण्यात आले.