भिवंडी : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी भिवंडी (Bhiwandi) येथील जाहीर सभेत महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या हत्येस आरएसएस (RSS) जबाबदार धरणारे विधान केले होते. याप्रकरणी आरएसएस कार्यकर्ते राजेश कुंटे (Rajesh Kunthe) यांनी भिवंडी न्यायालयात मानहानी याचिका दाखल केली होती.

राहुल गांधी यांच्यावर दाखल केलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी २२ फेब्रुवारी (February) रोजी होणार असल्याची माहिती त्यांचे वकील अ‍ॅड. नारायण अय्यर (Narayan Ayer) यांनी दिली आहे .

या प्रकरणात राहुल गांधी यांची बाजू मांडणारे अ‍ॅड नारायण अय्यर यांनी देखील राहुल गांधी हे गोवा, पंजाब व उत्तरप्रदेश येथील निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत.

Advertisement

यामुळे त्यांचा देखील गैरहजेरीचा अर्ज दाखल केला आहे. तसेच न्यायालयाने अय्यर यांचा अर्ज मंजूर करीत पुढील सुनावणी २२ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान दंडाधिकारी न्यायाधीश जे.व्ही. पलीवाल (Judge J.V. Paliwal) यांच्या न्यायालयात फिर्यादी राजेश कुंटे यांच्या तर्फे ऍड प्रबोध जयवंत व अ‍ॅड गणेश धर्गळकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर या याचिकेची सुनावणी घ्यावी असा तहकुबी अर्ज व युक्तिवाद केला होता.

परंतु सदर प्रकरणास स्थगिती आदेश आले नसल्याने या प्रकरणी फिर्यादीचा पुरावा नोंदविण्यासाठी २२ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी घेणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

Advertisement