छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मपत्नी महाराणी सईबाई यांची राजगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाल बुद्रुक या गावामध्ये समाधी स्थळ असून किल्याच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाड्यास व परिसरास शिवपट्टण म्हणत.

शिवपट्टण परिसराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आमदार संग्राम थोपटे व विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या परिसराची शनिवार (ता.०८) रोजी पाहणी केली.

या समाधीस्थळ व परिसराच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांसह जलसंपदा, भूमी अभिलेख, पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी करुन अहवाल सादर करण्याचेही निर्देश विधानपरिषद सभापतींनी यावेळी दिले होते.

Advertisement

छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांची राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या समाधी स्थळाचा विकास करण्यासाठी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार संग्राम थोपटे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्यासह महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी राजगडाच्या पायथ्याशी महाराणी सईबाई यांच्या समाधीस्थळ परिसराच्या विकासाच्या अनुषंगाने श्रीमंत छत्रपती महाराणी सईबाई महाराज स्मारक समिती ट्रस्टच्या वतीने तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.समाधी आणि परिसराचा विकास दोन टप्प्यात होईल असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

Advertisement

त्यानुसार आज शनिवारी (ता.८ ) रोजी डॉ. राजेश देशमुख यांनी राणी सईबाई समाधीस्थळ,शिवपट्टण,खंडोबाचा माळ या परिसराची पाहणी केली यावेळी आमदार संग्राम थोपटे,वेल्हेचे सभापती दिनकर सरपाले,पुरातत्व विभागाचे विलास वाहने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण,

भोरचे महसूल उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे ,अभियंता अजय भोसले, कार्यकरी अभियंता नीरा देवघर राजेंद्र आदींसह स्थानिक राजकीय पदाधिकारी आणि नागरीक उपस्थित होते.

गेली अनेक वर्षांपासून या समाधीस्थळ परिसराची दुरवस्था झाली होती तर या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग राहिला नव्हता तर येथील शिवकालीन जागेवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाली असल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी निर्माण होत होती परंतु या विकास परिसर आराखड्यामुळे येथील शिवकालीन इतिहासाला उजाळा मिळणार असून लाखो पर्यटक याठिकाणी भेट देतील.

Advertisement