मुंबई : या वर्षातील रेल्वे (Railway) भरती कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने सहाय्यक प्रकल्प अभियंता (Assistant Project Engineer) आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Senior Technical Assistant) पदांसाठी भरती निघाली आहे. त्यामुळे भारतीय रेल्वे सेवा मध्ये काम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

या भरतीनुसार पोस्टिंगचे ठिकाण नवी दिल्ली, रायपूर, सुरत, अंबाला, नागपूर आणि इतर कोणत्याही फॅब्रिकेशन हबमध्ये असेल. उमेदवारांनी वैयक्तिकरित्या सादर केलेल्या अर्जांची प्राथमिक खात्री केल्यानंतर, केवळ पात्र उमेदवारांचीच मुलाखत (Interview) घेतली जाईल.

कोणती आहेत रिक्त पदे?

Advertisement

सहाय्यक प्रकल्प अभियंता (फॅब्रिकेशन) : 4 पदे
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (फॅब्रिकेशन): 10 पदे

यासाठी पात्रता व अटी

यातील अर्ज करणारा उमेदवार सिव्हिल/मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठातून किमान 55% गुणांसह पदवीधर असावेत.

Advertisement

सिव्हिल/मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये) किंवा समतुल्य सहाय्यक प्रकल्प अभियंता (Assistant Project Engineer) साठी वयोमर्यादा 45 वर्षे आहे आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (बांधकाम) (sr. Technical Assistant) साठी वयोमर्यादा 35 वर्षे आहे.

अर्जाची तारीख व वेळ (Date&Time)

या भरतीसाठी पात्र उमेदवार 7 फेब्रुवारी 2022 रोजी डायरेक्ट जाऊन मुलाखत देऊ शकतात. या भरतीअंतर्गत एकूण 14 पदे भरण्यात येणार आहेत.

Advertisement

या पदांसाठी नोंदणीची वेळ फक्त सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत आहे. उमेदवारांना एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड सेक्टर-40, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई, 400706 या ठिकाणी कळवावे लागणार आहे.