पुणे – नुकतीच उन्हाळ्याची चाहूल लागली असताना पाऊस (Rain) पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. यामुळे ऐनवेळी पाऊस (Rain) पडणार असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण (Atmosphere) निर्माण झाले आहे. वातावरणात बदल झाला असून, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये वेगवान वाऱ्यासह पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. अचानक येणाऱ्या या पावसामुळे नागरिक सुद्धा चांगलेच हैराण झाले आहे. 

दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार (Meteorological Department) पुढी काही दिवस पावसाचा (Rain) हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया,

नागपूर आणि वर्धा हे जिल्हे वगळता आज संपूर्ण राज्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

सुरुवातीला जून महिन्यात पावसानं उघडीप दिली होती. त्यानंतर मात्र, जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात राज्यात तुफान पाऊस झाला. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात सरासरीपेक्षा 23 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. तसेच राज्यातील काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय? वाचा…

यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते.

तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जास्ती प्रमाणात पाऊस झाल्यास हा इशारा देण्यात येतो, त्यामुळे नागरिकांना साधवगिरी बाळगावी लागते.