अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकल्यामुळे मोठ्या अडचणींत सापडला होता. पण आता राजला जामीन मंजूर झाला आहे. परंतू अद्यापही राज कुंद्राकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आली नाही.
शिवाय तो सोशल मीडियापासून देखील दूर आहे. पण शिल्पा शेट्टी सतत सोशल मीडियावर आपले विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे.
आता शिल्पा सोशल मीडियावर आयफोन 13 मोबाईलचा बॉक्स दाखवत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
व्हिडिओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, ‘माझ्या आयफोन 13 ने मी अत्यंत प्रभावित आहे….’ शिल्पाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 12 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.
एवढंच नाही तर अनेकांनी कमेन्ट देखील केली आहे. एक युझर कमेन्ट करत म्हणाला की, ‘कुंद्राने दिला आहे का?’ सध्या शिल्पाची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
तर सोशल मीडियापासून देखील थोडी दूर राहिली. मात्र गेल्या काही दिवसांपासून शिल्पा सोशल मीडियावर नवनवीन पोस्ट करताना दिसतेय.