मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) गेल्या वर्षी 2021 मध्ये पोर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगात गेले होते आणि दोन महिन्यांहून अधिक काळानंतर त्यांची सुटका झाली होती. आता 1 वर्षानंतर राज कुंद्राने या प्रकरणी आपल्या बाजूने खुलासा केला आहे. त्यांनी याप्रकरणी सीबीआयला पत्र लिहून आपण निर्दोष असल्याचा दावा केला असून या प्रकरणात आपल्याला जबरदस्तीने गोवण्यात आले आहे. राज कुंद्रा (Raj Kundra) यांनी असा दावाही केला आहे की, एक बडा उद्योगपती आणि मुंबई पोलिसांचे (mumbai police) काही अधिकारी आपल्याला फसवण्यात गुंतले आहेत.

राज कुंद्रा यांनी पत्र लिहिले…
राज कुंद्रा यांनी आपल्या पत्रात व्यावसायिकाचे नाव लिहिले नसून त्यांनी अनेक पोलिस अधिकाऱ्यांची (mumbai police) नावे लिहिली आहेत. त्यांनी लिहिले आहे की 4000 पानांच्या आरोपपत्रात त्यांचे नाव नाही,

तरीही पोलिसांनी त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आणि साक्षीदारांवर दबाव टाकला. त्याच्याविरुद्ध कट करणाऱ्यांचे पोलिसांशी चांगले संबंध आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनीही आपला काळा पैसा त्या व्यावसायिकाकडे गुंतवला आहे. असं ते म्हणाले.

राज कुंद्रा यांनी चौकशीची विनंती केली…
राज कुंद्राने पत्रात लिहिलं आहे की, ‘मी एक वर्ष गप्प बसलो आणि मीडिया ट्रायलमुळे तुटून पडलो. मी आर्थर रोड तुरुंगात 63 दिवस काढले आहेत.

मला न्यायालयाकडून न्याय हवा आहे, त्यावर माझा विश्वास आहे. मी या सर्व पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची विनंती करतो.’ असं देखील ते म्हणाले आहे.

राज कुंद्रा पोर्नोग्राफी केस…
राज कुंद्रा यांनी अलीकडेच पॉर्नोग्राफी प्रकरणी मॅजिस्ट्रेट कोर्टात डिस्चार्ज अर्ज दाखल केला होता. राज कुंद्राच्या या अर्जाला मुंबई क्राइम ब्रँचने विरोध केला असून, त्यांच्या विरोधात अनेक पुरावे आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

विशेष म्हणजे 2021 मध्ये मुंबई क्राइम ब्रँचने राज कुंद्राला पॉर्न फिल्म बनवल्याप्रकरणी अटक केली होती. यादरम्यान काही मॉडेल्स आणि स्ट्रगलिंग अभिनेत्रींना पॉर्न फिल्म्ससाठी जबरदस्ती केल्याचं समोर आलं होतं.