पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray in Pune) हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. विदर्भ दौऱ्यानंतर आता राज ठाकरे (Raj Thackeray) पुणे दौऱ्यावर आहेत. काल पुण्यातील डेक्कन परिसरातील राज महाल येथे त्यांचे आगमन झाले. त्यानंतर आज सकाळी राज ठाकरे(Raj Thackeray) स्वतः चारचाकी वाहन चालवत नवी पेठतील कार्यालयात दाखल झाले.

यावेळी राज ठाकरेंच्या सोबत मनसेचे नेते अभिजीत पानसे, अविनाश अभ्यंकर, किशोर शिंदे हे पदाधिकारी देखील सोबत होते. मात्र, जेव्हा राज ठाकरे आपल्या पक्ष कार्यालयात जाण्यासाठी निघाले, तेव्हा एक खास गोष्ट घडली. चक्क वासुदेव राज ठाकरे यांच्या भेटीला आला होता.

सकाळी राज ठाकरे पक्ष कार्यालयात जात असताना वासुदेवाने राज ठाकरेंसोबत फोटो (Raj Thackeray Photo) काढण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी राज ठाकरे यांनीही वासुदेवाचा हट्ट पुरवला.

राज ठाकरे यांनी थांबून वासुदेवासोबत फोटो काढला आणि त्यांना हात जोडून नमस्कारही केला. सध्या त्यांचे हे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आज आणि उद्या राज ठाकरेही पुण्याच्या दौऱ्यावर आहेत.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे पुणे दौर्‍यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध पक्षातील पदाधिकारी मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शहरातील कोणते नेते मनसेमध्ये प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पुण्यात वसंत मोरे यांच्या नेतृत्त्वात आज मनसेकडून शक्तिप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक जण आज पुण्यात मनसेत प्रवेश करणार आहे.

खडकवासला, भोर, वेल्हा मुळशीतील पदाधिकारी मनसेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पुण्यातील मनसेची ताकद वाढणार आहे. पालिका निवडणुकांच्या आधी मनसेतील वाढतं इनकमिंग महत्त्वपूर्ण मानलं जातंय. त्यावेळी राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.