पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेने अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या पुण्यात (pune) आहेत. त्यांच्या उपस्थितीत मनसेच्या (mns) नव्या सदस्यांशी नोंदणी होत आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) पुण्यात पोहोचल्यानंतर नवी पेठेतील शहर कार्यालयास भेट दिली. यावेळी ढोलपथकाच्या विशेष वादनात त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी मनसेचे नेते उपस्थित होते. तसंच मनसेच्या या सभासद नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मोठ्या संख्येने लोक सदस्य नोंदणीसाठी उपस्थित आहेत.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक पक्षाला दोन ते अडीच वर्षानंतर सदस्य नोंदणी करावी लागते त्यानुसार ही नोंदणी होत असल्याचं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

यावेळी सर्वात प्रथम राज ठाकरेंची (Raj Thackeray) सदस्य म्हणून नोंदणी करत मोहिमेला सुरुवात करण्यात आली. राज ठाकरेंनी मिश्किलपणे आपल्याला सदस्य करुन घेतल्याबद्दल पक्षाचे आभार मानले.

तसंच महाराष्ट्रातील नागरिकांना सभासद होण्यासाठी आवाहन केलं. आज संपूर्ण दिवस राज ठाकरे पुण्यात असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला आहे.

राज ठाकरे काय म्हणाले…

“आजपासून मनसेची सभासद नोंदणी सुरु होत आहे. आजपर्यंत मुंबईत ही नोंदणी झाली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, दर तीन ते चार वर्षांनी प्रत्येक पक्षाला नव्याने नोंदणी करावी लागते.

याआधीची नोंदणी लॉकडाउनच्या आधी झाली होती. त्यामुळे आता नव्याने नोंदणी पुन्हा सुरु होत आहे. माझी महाराष्ट्रातील तमाम माता, भगिनी आणि बांधवांना मनसेचे सदस्य व्हावं अशी विनंती आहे. असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.

तसेच ते पुढे म्हणाले, “यावेळेला जे सदस्य होणार आहेत त्या सदस्याला प्रत्येक आठवड्यात काहीतरी नवीन गोष्ट पक्षाकडून त्यांच्या मोबाईलवर जाणार आहे.

त्यामध्ये माझे भाषणं असतील, महाराष्ट्रासंबंधी काही विषय असतील अशा गोष्टी सदस्याला आमच्याकडून देण्यात येणार आहेत,

या सदस्य नोंदणीमध्ये मी माझं पहिलं नाव नोंदवलं आहे. तुम्हीही मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी व्हावं.” असं देखील राज ठाकरे यावेळी म्हणाले.