पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray in Pune) हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. विदर्भ दौऱ्यानंतर आता राज ठाकरे (Raj Thackeray) पुणे दौऱ्यावर आहेत. काल पुण्यातील डेक्कन परिसरातील राज महाल येथे त्यांचे आगमन झाले. त्यानंतर आज सकाळी राज ठाकरे(Raj Thackeray) स्वतः चारचाकी वाहन चालवत नवी पेठतील कार्यालयात दाखल झाले.

यावेळी राज ठाकरेंच्या सोबत मनसेचे नेते अभिजीत पानसे, अविनाश अभ्यंकर, किशोर शिंदे हे पदाधिकारी देखील सोबत होते. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे पुणे दौर्‍यावर आले आहेत.

त्यांच्या उपस्थितीत विविध पक्षातील पदाधिकारी मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शहरातील कोणते नेते मनसेमध्ये प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आज मनसे पक्षात अनेकांचा पक्षप्रवेश झाला असून, यामध्ये भोर, वेल्हे, मुळशी या भागातून कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. आजच्या होणाऱ्या सर्व नियुक्ती आणि पक्षप्रवेश या बारामती लोकसभा मतदारसंघातील आहेत.

त्यामुळे येत्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघात आमची ताकद वाढणार आहे, असं मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यावेळी म्हणालेत. पुण्यात वसंत मोरे (Vasant More) यांच्या नेतृत्त्वात आज मनसेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.

बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक जण आज पुण्यात मनसेत प्रवेश करत आहेत. राज्यातील राजकीय समीकरणं बदलल्यानंतर मनसे अधिक अॅक्टिव्ह झाली आहे.

मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्या नेतृत्वात हे शक्तिप्रदर्शन झालं. यावेळी बोलताना मनसेची पुढची राजकीय समीकरणं काय असतील यावर वसंत मोरे त्यांनी भाष्य केलंय.

2024 च्या लोकसभा निवडणुकीतील रणनितीविषयीही ते बोलले. विशेषत: बारामती लोकसभा मतदारसंघाविषयी त्यांनी महत्वपूर्ण भाष्य केलं आहे. मात्र, पालिका निवडणुकांच्या आधी मनसेतील वाढतं इनकमिंग महत्त्वपूर्ण मानलं जातंय. आणि यावरच राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.