मुंबई : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Corporation Election) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) चांगलीच कंबर कसल्याचे दिसत आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका निवडणुकीबाबत बैठक घेण्यात आली आहे.

या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई (Mumbai) मध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक संपल्यानंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आदेश देखील दिले आहेत.

राज्यातील आगामी महापालिका निवडणुका (Election) कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याची तयारी ठेवायला राज ठाकरे यांनी सांगितले आहे. येणाऱ्या निवडणुकीसाठी मनसेने स्वबळाचा नारा दिल्याचे दिसत आहे.

Advertisement

एप्रिल महिन्यात निवडणूका आहेत असे गृहीत धरून कामाला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकारी (Incumbent) आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. स्वबळाची तयारी असली पाहिजे असेही राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

येणाऱ्या काही दिवसात महापालिका निवडणुकीसाठी मनसे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठक आयोजित केल्या जातील आणि या बैठक (Meeting) स्वतः राज ठाकरे घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात आणि निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी मनसे पक्षाची बैठक आज मुंबईमध्ये घेण्यात आली आहे. या बैठकीला मुंबई , पुणे , पिंपरी चिंचवड , ठाणे आणि नाशिक येथील पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement