मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे याच्या पुण्यातील दौऱ्यात एका चिमुरड्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. तिसरीत शिकणारा सोहम जगताप आईशी भांडून राज यांचा ऑटोग्राफ घ्यायला आला होता.

राज यांनीही मग खुल्या दिल्याने या चिमरड्या फॅनचे लाड पुरवले. नगरसेवक, मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या पाठीवर वही ठेवून राज यांनी वहीवर सही केली. त्यामुळे उपस्थित सर्वजण अचंबित झाले.

मला ते आवडतात म्हणून मी घेतला त्यांचा ऑटोग्राफ

राज सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांचे फक्त राजकारणातच नाही, तर सर्वंच वयोगटात फॅन्स आहेत. पुणे दौऱ्यात राज यांचा एक चिमुरडा फॅन दिसून आला. राज यांनी या फॅनला ऑटोग्राफ दिला.

Advertisement

मी राज ठाकरेंना म्हटलं, ‘ऑटोग्राफ द्या, त्यांनी मग देतो म्हणाले. मला ते आवडतात म्हणून मी त्यांचा ऑटोग्राफ घेतला,’ असं सोहमने सांगितलं.

बॅनरबाजी करण्याऐवजी लोकांच्या मनापर्यंत जा

दरम्यान, राज यांनी कसबा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या वेळी राज यांनी इच्छुकांची परीक्षा घेतली. प्रभाग रचना कशी आहे, काय कामं केली, लोकांपर्यत पोहोचण्यासाठी काय करता असे प्रश्न विचारले.

फ्लेक्स होर्डिंग लावून बॅनरबाजी करण्याऐवजी लोकांच्या मनापर्यंत जा, लोकांची कामं करा, पक्ष संघटना मजबूत करा, असा आदेश राज यांनी दिला.

Advertisement

9 मतदारसंघांचा आढावा घेणार

ठाण्याचा दौरा आटोपून राज पुन्हा एकदा पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. काल संध्याकाळी ते पुण्यात पोहोचले. तीन दिवसांच्या या दौऱ्यात ते एकूण 9 मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.

तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या मार्गी लावणार आहेत. पुणे महापालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीच्या अनुषंगाने राज यांचा हा दौरा होत असल्याने त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

 

Advertisement