राजगुरुनगर – ऐन सणासुदीच्या काळात राजगुरूनगर (Rajgurunagar) मध्ये एक धक्कादाय प्रकार घडला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच दहशद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मासे कापण्याच्या सुऱ्याने एकाच्या डोक्यात गंभीर वार (Crime News) केला आहे. हा प्रकार घडल्याने नागरिक देखील भीतीच्या वातावरणात राहत आहेत. आमचेकडे आलेले गिऱ्हाईक तुझ्याकडे का घेऊन जातो असे म्हणत दोन मासे विक्री करणाऱ्यामध्ये वाद झाला. यानंतर मासे कापण्याच्या सुऱ्याने एकाच्या डोक्यात गंभीर वार (Crime News) करत जखमी केलं आहे.

सोयल रफिक मोमीन (वय 26 रा. मोमीन आळी राजगुरूनगर ता. खेड) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव असून आमन मोमीन व सुफियान मोमीन उर्फ दुध्या रा. राजगुरूनगर (ता.खेड ) यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मासे विक्रीचे स्टालचे दुकानावर मासे विक्री करीत असताना शेजारील मासे विक्री करणारा दुकानदार आमन मोमीन व सुफियान मोमीन उर्फे दुध्या यांनी तू आमच्याकडे आलेले गिऱ्हाईक तुझ्याकडे का घेऊन जातो असे म्हणत शिवीगाळ आणि दमदाटी करण्यास सुरूवात केली.

यानंतर आमन मोमीन याने मासे कापण्याच्या सुऱ्याने फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक भारत भोसले करत आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूसर्वीच पिंपरी चिंचवड मध्ये पूर्व वैमनस्यातून तरुणाचा टोळक्याकडून कोयत्याने वार करत त्याचा खून करण्यात आला होता. ही घटना मोशी येथे 25 ऑक्टोबर रोजी अकराच्या सुमारास घडली होती.

ही एक घटना ताजी असतानाच राजगुरूनगर मध्ये प्रकार घडल्याने सामान्य नागरिक भीतीच्या वातावरणाखाली राहत आहे. त्यामुळे पोलिसांनी देखील अश्या गुन्हेगारांना तात्काळ बेड्या ठोकल्या अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.