ईडीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मामांच्या जरंडेश्वर कारखान्याची मालमत्ता जप्त केल्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सवाल उपस्थित केला आहे. ईडीकडून केली जाणारी कारवाई राजकीय दबाव वाढवण्यासाठी केली जाते, असा आरोप त्यांनी केला

एकाच का, ४३ कारखान्यांवर कारवाई करा

राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून साखर कारखान्यावर कारवाई केली जाते. एकच नाही तर 43 साखर कारखान्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.

ते शेट्टी म्हणाले, की मी अनेक दिवसांपासून सांगत आलो आहे, की ईडी, प्राप्तिकर, सीबीआय ही केंद्र सरकारच्या हातातली हत्यारे आहेत आणि त्याचा उपयोग राजकीय दृष्ट्या ब्लॅकमेल करण्यासाठी सातत्याने होत आहे. त्यातलाच हा प्रकार दिसतोय.

Advertisement

माझी फिर्यादच घेतली नाही

महाराष्ट्रातले 43 साखर सहकारी कारखाने कवडीमोल किमतीने विकले गेले. त्याला जबाबदार असणाऱ्या 89 व्यक्तींविषयी मी मुंबई उच्च न्यायालयात पाच वर्षांपूर्वी याचिका दाखल केली आहे; मात्र याची चौकशी झाली नाही.

उच्च न्यायालयाने मला एफआयआर दाखल करण्यासाठी सांगितले. त्या वेळी पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला नाही.

ईडी झोपली होती का ?

मी ईडीच्या दारात हेलपाटे घातले. प्राप्तिकर विभागाकडे सातत्याने गेलो. सीबीच्या दारात हेलपाटे घातले. त्या वेळी कोणत्याही यंत्रणेने माझ्याकडे लक्ष दिले नाही.

Advertisement

43 सहकारी साखर कारखाने सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आहेत. त्यामुळे साखर कारखान्याच्या विक्रीची चौकशी झालीच पाहिजे.

जेव्हा मी पुरावे सादर केले तेव्हा ईडी झोपली होती काय? असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला. सर्वपक्षीय नेत्यांनी कारखान्यावर दरोडा टाकला आहे. म्हणूनच 43 साखर कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

 

Advertisement