मुंबई – भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील (Share Market) मोठे प्रस्थ आणि शेअर बाजाराचे ‘किंग’ (king) म्हणून ओळखले जाणारे ‘राकेश झुनझुनवाला’ (Rakesh Jhunjhunwla) यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 62 व्या वर्षी त्यांना मुंबईतील (mumbai) ब्रीच कँन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सकाळी 6 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ‘राकेश झुनझुनवाला’ (Rakesh Jhunjhunwla) यांची शेअर बाजारातील बिग बुल अशी देखील ओळख होती.

दरम्यान, तुम्हाला देखील असा प्रश्न पडला की, शेअर बाजारातील (Share Market) अनेकांची उमेद असणाऱ्या राकेश झुनझुनवालांवर (Rakesh Jhunjhunwla) नेमका प्रभाव कोणाचा होता, त्यांचे मार्केटमधील गुरु कोण?

मात्र, बाजारात झुनझुनवालाचा (Rakesh Jhunjhunwla) गुरू किंवा शिक्षक कोण हे फार कमी लोकांना माहीत असेल? आणि आज आम्ही तुम्हाला ते सांगणार आहोत.

खुद्द राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwla) यांनीच याबाबत खुलासा केला होता. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपले गुरू कोण हे सांगितले होते.

गुरूकडून मिळालेल्या शिक्षणाने त्यांना आज यशाच्या या शिखरावर पोहोचवल्याची प्रामाणिक प्रतिक्रिया ही त्यांनी यावेळी दिली होती.

राकेश झुनझुनवाला यांच्या आयुष्यावर सर्वात मोठा प्रभाव त्यांच्या वडिलांचा होता. वडिलांच्या गुरुमंत्राने त्यांनी मार्केटमध्ये पाय ठेवला होता.

बाजारात गुंतवणूक करायची असेल तर स्वतःच्या कमाईने करायची हा गुरुमंत्र त्यांनी कसोशिने पाळला. वडिलांनीच त्यांना जीवनमूल्ये समजावून सांगितली. त्याच्या वडिलांनी मोठे निर्णय घेण्यात मदत केली.

मोठे निर्णय घेताना संकोच करू नये,असे वडिल नेहमी आपल्याला सांगायचे असे त्यांनी आठवणीत रमताना सांगितले. त्यांच्या वडिलांव्यतिरिक्त त्यांचे इतर गुरु राधाकिशन दमानी आणि रमेश दमानी आहेत. स्वतः त्यांनी याबद्दल खुलासा केला.

1985 साली राकेश झुनझुनवालायांनी कॉलेजमध्ये असल्यापासूनच शेअर ट्रेडींगला सुरुवात केली. त्यावेळेस बीएससीचा सेन्सेक्स केवळ 150 अंकांवर होता.

पहिल्यांदा त्यांनी पाच हजारांची गुंतवणूक करत ट्रेडिंगला सुरुवात केली.‘फोर्ब्स’च्या यादीनुसार सध्या राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती 43, 796 कोटी (5.5 बिलियन डॉलर्स) आहे.