मुंबई – चित्रपट निर्माता करण जोहरचा (karan johar) लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan 7) सीझन सात चाहत्यांना थक्क करण्यासाठी सज्ज आहे. त्याचे मागील 6 सीझन सुपर-डुपर हिट ठरले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan 7) या चॅट शोच्या माध्यमातून सिनेविश्वातील कलाकार एकाच छताखाली येतात.

ज्यांच्यासोबत करण जोहर (karan johar) फनी गॉसिप करताना दिसत आहे. त्याचवेळी, आता शोच्या 7 व्या सीझनमध्येही (Koffee With Karan 7) असेच काहीसे पाहायला मिळणार आहे.

करण जोहरने त्याच्या चॅट शोचा एक मजेदार प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच त्याने शोची ऑन एअर डेटही सांगितली आहे.

पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, साऊथच्या या दोन दिग्गज सुपरस्टार्सनी करण जोहरच्या चॅट शोपासून स्वतःला दूर केले आहे.

करण जोहरने चॅट शोसाठी आरआरआर चित्रपटाची स्टारकास्ट ‘राम चरण’ (ram charan) आणि ‘जूनियर एनटीआर’शी (jr ntr) संपर्क साधला होता. मात्र, दोन्ही स्टार्स या चॅट शोचा भाग असणार नाहीत.

हे दोघेही या चॅट शोमध्ये सहभागी होणार की नाही हे अद्याप स्पष्ठ झाले नाही. त्याच वेळी, सूत्रांनी सांगितलं आहे की राम चरण आणि जूनियर एनटीआर ‘कॉफी विथ करण 7’ मध्ये दिसणार नाहीत.

त्यांच्याऐवजी टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन या शोचा भाग असू शकतात. याआधी करण जोहरने चॅट शोमध्ये स्टार्ससोबत येण्याबाबत बोलले होते.

करण जोहरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ. जुन्या सिझनमध्ये दिसलेल्या सेलिब्रिटींच्या व्हिडिओ क्लिपमधून हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये शाहरुख खान, बिपाशा बसू, सैफ अली खान, करीना कपूर, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग असे सर्व स्टार्स दिसत आहेत आणि ते सगळे म्हणत आहेत, ‘कोण?

यानंतर आणखी काही सेलिब्रिटींचे व्हिडिओ समोर आले आहेत, जे ‘करण… करण.. करण’ म्हणताना दिसत आहेत. यानंतर करण जोहरचा प्रवेश होतो आणि तो म्हणतो की ‘कॉफी विथ करण सीझन 7’ पुन्हा येत आहे.