मुंबई : रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी कोरोना (Corona) मुळे देशात मृत्यू (Death) पावलेल्या रुग्णाबाबत भाष्य करताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आव्हान केले आहे. तसेच शिवसेनेला (Shivsena) भाजपसोबत (BJP) येण्याचे आव्हान देखील आठवले यांनी केले आहे.

कोरोनामुळे देशात ५ लाख मृत्यू झाले आहेत. त्यामुळे गर्दी टाळायला हवी. कोरोनाचा सामना करण्याची जबाबदारी जशी सरकारची तशी आपली आहे. केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.

देशापैकी २५ टक्के केसेस महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लवकर बर होऊन कोरोनाविरोधात दंड थोपटावे. उद्धवजी आणि आमचे घरोब्याचे संबध आहेत.

Advertisement

भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आली होती, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली आहे. मात्र, शिवसेनेने भाजपसोबत यावे. फडणवीसांना मुख्यमंत्री करावे.

भाजपला विश्वास होता की, काँग्रेस पाठिंबा देणार नाही. मात्र, त्यांचा तो अंदाज चुकल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

दलित पँथरला (Dalit Panther) पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. पँथरच्या पुनरुज्जीवनाची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. येणाऱ्या पाच राज्याच्या निवडणुकीत आम्ही भाजप सोबत राहणार आहोत.

Advertisement

मात्र, युती झाली नाही तर आम्ही लढू. पंजाबमध्ये (Panjab) काँग्रेसने (Congress) विश्वास गमावलेला आहे. बाबासाहेबांचे संविधान बद्दलण्यासाठी आणि दलितांचे आरक्षण रद्द करण्यासाठी मोदी सरकार सत्तेवर आले आहे, असा अपप्रचार केला जातोय, असा आरोपही आठवले यांनी केला आहे.