पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Union Minister of State for Social Justice Ramdas Athavale) यांनी शौर्य दिनानिमित्त (Day of Valor) कोरोगाव भीमा  विजयस्तंभाला (Victory Pillar) अभिवाद केले यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला सत्तेतून घालवायचे असल्याचा संकल्प केला आहे.

रामदास आठवले यांनी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनोख्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Sarkar) टीका केली आहे. कोरेगाव भीमा (Koregav Bhima) येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना आठवले म्हणाले की, आज मला झालाय फार हर्ष कारण आमच्या समोर उभे आहे २०२२ चे वर्ष असे रामदास आठवले म्हणाले. तसेच २०२२ या नवीन वर्षांमध्ये रिपब्लिकन पक्षाची (Republican party) ताकद वाढवायची असल्याचेही आठवले म्हणाले आहेत.

Advertisement

चंद्रशेखर आझाद (Chandrasekhar Azad) यांनीही शौर्यदिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, जसे जगण्यासाठी श्वासाची गरज लागते, तसे नव्या वर्षाच्या सुरवातीला येथे यावे लागते.

जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत येथे येत राहणार असल्याचे चंद्रशेखर आझाद म्हणाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी सगळ्यांसाठी काम केले. २०१८ मध्ये घडलेली घटना दुखद होती.

पण २०१८ मधल्या केसेस पेंडींग आहेत. सरकार त्याबाबत काही करत नाही. पुढील काळात सरकारने काही केल नाही तर मोर्चा काढावा लागेल, असा इशारा देखील चंद्रशेखर आझाद यांनी दिला आहे.

Advertisement