मुंबई : आगामी काळात राज्यात महापालिका निवडणूक (Municipal Corporation Election) होणार आहेत. याच महापालिका निवडणुकीसाठी मनसे (MNS) आणि भाजप (BJP) एकत्र येणार असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. मात्र, रामदास आठवलेंनी (Ramdas Athavale) या चर्चांना पूर्णविराम दिल्याचे दिसत आहे.

रामदास आठवलेंचा पंढरपूर (Pandharpur) दौरा सुरु यावेळी त्यांनी हे भाष्य केले आहे. रामदास आठवलेंनी विधान कशामुळे केले हाच प्रश्न सर्वांना पडला असेल. रामदास आठवले यांना पंढरपूर दौऱ्यावर असताना मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत (Mumbai Municipal Corporation Election) प्रश्न विचारण्यात आला.

आरपीआयचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी भाजपाला मनसेची गरज नसल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे आता भाजप माणसे युती होणार का याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि मनसेची युती होणार असल्याची चर्चा रंगात होती. मात्र आता रामदास आठवले यांनीच मनसेची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.

भाजप सोबत आरपीआय असल्यामुळे मुंबई महानगर पालिका निवडणुकीत शिवसेनेला हरवणे फार अवघड नाही. पालिका निवडणुकीत भाजप १२० पेक्षा अधिक जागा मिळवून सत्तेत येणार आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या टिकेमुळे शिवसेनेवरच (Shivsena) निगेटीव परिणाम होत आहे. ईडी , सीबीआय, चा उपयोग संजय राऊत आणि मंत्र्यांच्या विरूध्द करुन सरकार पडेल असा काही विषय नाही अंतर्गत मतभेदामुळेच हे सरकार आपोआप पडेल असेही रामदास आठवले म्हणाले आहेत.

Advertisement