ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

राणे यांना पहिल्या रांगेत स्थान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ मंत्रिमंडळाचा विस्तार करायचं असं ठरविलं नसून, त्यात अनेक धक्कादायक बदल करण्याचे ठरविले आहे.

त्यामुळे काही मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत, तर नव्यानं समावेश केलेल्या काहींना महत्त्वाची पदं मिळण्याची शक्यता आहे. मोदी यांनी घेतलेल्या बैठकीत नारायण राणे या एकमेव मराठी नेत्याला पहिल्या रांगेत स्थान मिळालं आहे.

राणे यांना मिळू शकते महत्त्वाचे खाते

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आता थोडाच अवधी राहिला आहे. मोदी यांच्या मंत्रिमंडळातील अनेक बड्या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह महत्त्वाच्या मंत्रालयांचा कार्यभार असलेल्या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत.

त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात नावं असलेल्या काहींना महत्त्वाची खाती मिळू शकतात. मोदी यांनी थोड्याच वेळापूर्वी संभाव्य मंत्र्यांशी संवाद साधला. मोदी संभाव्य मंत्र्यांशी संवाद साधत असल्याचे दोन फोटो समोर आले आहेत.

यापैकी एक फोटो समोरून काढण्यात आलेला आहे. यात सर्व संभाव्य मंत्री दिसत आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्क असल्यानं सर्व उपस्थितांचे चेहरे नीट दिसत नाहीत; मात्र पहिल्या रांगेतील सर्वांचे चेहरे ओळखू येत आहेत.

मोदी यांच्या उजव्या बाजूला पहिल्याच रांगेत भाजप खासदार नारायण राणे आहेत. राणे यांना पहिल्याच रांगेत स्थान देण्यात आल्यानं त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

शिंदे यांना मोठी जबाबदारी

राणे यांच्या शेजारी काही अंतरावर सर्वानंद सोनोवाल आहेत. आसामचं मुख्यमंत्रिपद हिमंता बिस्व सरमा यांच्यासाठी सोडणाऱ्या सोनोवाल यांना महत्त्वाचं खातं मिळू शकतं. पक्ष नेतृत्त्वाच्या एका आदेशावर मुख्यमंत्रिपद सोडल्याचं बक्षीस त्यांना मिळू शकेल.

सोनोवाल यांच्या शेजारी भाजपचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे आहेत. शिंदे यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह काँग्रेसला रामराम केला. त्यामुळेच मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आली. त्यामुळं शिंदे यांच्याकडंही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.

यांनाही मिळू शकते चांगले खाते

शिंदे यांच्या शेजारी, मोदींच्या अगदी डावीकडं संयुक्त जनता दलाचं (जेडीयू) राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह आहेत. त्यांच्याकडंदेखील महत्त्वाचं मंत्रालय दिलं जाऊ शकतं. जेडीयूनं मोदींकडं चार मंत्रिपदं मागितली आहेत.

मोदी यांनी आतापर्यंतच कोणत्याच मित्रपक्षाला एकापेक्षा अधिक मंत्रिपदं दिलेली नाहीत. त्यामुळं जेडीयूची मागणी पूर्ण होतं का, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राणे यांच्यामागं बसलेल्या पशुपती पारस यांना महत्त्वाचं खातं मिळू शकतं.

लोकजनशक्ती पक्षाचे खासदार असलेल्या पारस यांनी चिराग पासवान यांची गोची करत संपूर्ण पक्षच ताब्यात घेतला आहे. त्यांच्या या राजकीय खेळीमुळं गेल्याच महिन्यात ते चर्चेत आले होते.

You might also like
2 li