Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

मोदींच्या मंत्रिमंडळात राणे, पाटील, कराड, भारती पवार

केंद्रीय मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील दोन सदस्यांना राजीनामा द्यावा लागला आहे, तर महाराष्ट्रातील चार नव्या शिलेदारांना मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे.

महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवारस हे मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे चार नवे शिलेदार आहेत.

संभाव्य मंत्र्यांशी संवाद

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आता थोडाच अवधी राहिला आहे. मोदी यांच्या मंत्रिमंडळातील अनेक बड्या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत.

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह महत्त्वाच्या मंत्रालयांचा कार्यभार असलेल्या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत.

त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात नावं असलेल्या काहींना महत्त्वाची खाती मिळू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थोड्याच वेळापूर्वी संभाव्य मंत्र्यांशी संवाद साधला.

४३ जणांची यादी

मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालेल्या ४३ नेत्यांची यादी समोर आली आहे. यात महाराष्ट्रातील चार जणांचा समावेश आहे. नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड या चार नावांचा समावेश आहे.

राणे यांना मोदी यांच्याकडून मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मोदी यांनी थोड्याच वेळापूर्वी संभाव्य मंत्र्यांशी संवाद साधला. त्यामुळे राणे पहिल्याच रांगेत दिसले होते.

त्यामुळे राणे यांना केंद्रात महत्त्वाचं खातं दिलं जाऊ शकतं. राणे यांच्या माध्यमातून कोकणात भाजपची ताकद वाढवण्यावर मोदी यांनी लक्ष दिल्याचं समजतं.

शिवसेनेला शह

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय पेटला आहे. यावरून भाजप महाविकास आघाडी सरकारवर सातत्यानं निशाणा साधत आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजातील मोठे नेते असलेल्या राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.

राणे शिवसेनेला सातत्यानं लक्ष्य करत असतात. कोकणात शिवसेनेची ताकद आहे. राणे यांनी मंत्रिपदाची रसद देऊन कोकणात शिवसेनेला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

Leave a comment