ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

राणेंना मंत्रिपद म्हणजे शिवसेनेची ताकद वाढली!

नारायण राणे यांना मंत्रिपद देणे म्हणजे शिवसेनेची ताकद वाढल्याची प्रचिती भाजपच्या नेत्यांना आली असून आपणास लढायला जमत नाही, म्हणूनच राणे यांना मंत्री करून पुढे केले आहे, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली.

शिवसेना पदाधिका-यांची बैठक

सावंतवाडी मळगाव येथे आयोजित प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक केसरकर, सह संर्पकप्रमुख अरूण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, मतदार संघसर्पक अध्यक्ष विक्रांत सावंत, जिल्हा परीषदेतील गटनेते नागेंद्र परब, नगरसेवक जयेंद्र परूळेकर, तालुकाप्रमुख रूपेश राउळ, बाबूराव धुरी, यशवंत परब, बाळा दळवी आदी उपस्थित होते.

राणेंना तीनदा केले पराभूत

ज्यांना शिवसेनेने तीन वेळा पराभूत केले, त्यांना मंत्रिपद देऊन आमच्या विरोधात लढण्यास उतरवणे हेच मुळात हस्यास्पद आहे.

ही शिवसेनेची ताकद वाढल्याची प्रचिती आहे. आताच्या भाजपला आमच्या विरोधात लढण्याचे बळ उरले नाही, अशी टीका त्यांनी केली.

सूक्ष्म खाते दिले म्हणजे विकास झाला असे नाही. उलट आमदार दीपक केसरकर यांनी यापूर्वीच मंत्रिपदाच्या काळात जिल्ह्याचा शाश्वत तसेच सूक्ष्म विकास साधल्याचेही राऊत यांनी सांगितले.

सहकार मोडीत काढण्यासाठी नवीन खाते

केंद्राकडून नवीन सहकार खाते निर्माण करून एक प्रकारे महाराष्ट्रातील सहकार मोडीत काढण्याचे काम सुरू केले असून सहकार मंत्रालयाकडून ईडीच्या माध्यमातून सहकारावर घाला घालण्याचे काम सुरू आहे.

तुम्ही कितीही जणांच्या मागे ईडी लावा; पण सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

You might also like
2 li