पुणे – पुणे जिल्ह्यातील (Pune Gramin) रांजणगाव (Rajnandgaon) परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. ड्रेनेज साफ करताना दोन कामगारांचा दुर्दैवी अंत असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मच्छिंद्र काळे आणि सुभाष उघडे असं मृत्यू झालेल्या कामगारांची नावं आहेत. रांजणगाव (Rajnandgaon) परिसरातील एमआयडीसीमधील (Ranjangaon MIDC) फियाट कंपनीचं ड्रेनेज साफ करताना ही घटना घडली आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर कामगारांच्या (Employees) परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ते राहत असलेल्या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव परिसरातील एमआयडीसीमधील फियाट कंपनीचं ड्रेनेज साफ करण्याचं काम सुरु होतं. दोघेही कामासाठी रावाना झाले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे सुपरवायझरदेखील होते.

काम करत असताना एका कामगाराचा पाय चुकून घसरला आणि कामगार ड्रेनेजच्या डक्टमध्ये पडला. या सगळा प्रकार पाहून सोबत असलेला दुसऱ्या कामगाराने साथीदाराला वाचवण्यासाठी डक्टमध्ये उडी मारली.

यात दोघेही बुडल्याचं कळताच सुपरवायझर यांनी मदतीसाठी हाक मारली. ते कंपनीत देखील मदत मागण्यासाठी गेले. मात्र डक्ट प्रचंड प्रमाणात खोल असल्याने दोघेही लगेच बुडाले.

मात्र, या दोघांना बाहेर काढणं कठीण होत, पण अनेक प्रयत्नांनी शेवटी हे कामगार ड्रेनेजच्या बाहेर आले. या दोघांना जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं होत.

दरम्यान, हे काम कामगार ज्या ड्रेनेज मध्ये गेले होते तेथे घाण पाणी काही प्रमाणात असल्यामुळे या दोघांचा आतच मृत्यू झाला होता. आणि बाहेर काढताना या दोघांचे मृतदेह सापडले.

पुण्यात सेप्टीक चेंबरची स्वच्छता करताना तिघांचा गुदमरून मृत्यू :

काही दिवसांपूर्वीच वाघोली परिसरात सेप्टीक टँक साफ करताना तिघा कामगारांचा दुर्दैवी अंत झाला होता. सुरुवातीला सेप्टींक टँकमध्ये उतरलेल्या दोघा जणांचा मृतदेह हाती लागला होता.

तर अन्य एका जनाचा मृतदेह नंतरहाती लागला होता. सेप्टींग टँकमध्ये गुदरल्यानं या तीन कामगारांचा श्वास कोंडून त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी माहिती पुणे महागर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आली होती.