Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

हाॅटेल व्यावसायिकाकडून खंडणी; कथित महिलेसह दोन पत्रकाराला अटक

अलीकडे पत्रकार असल्याचे सांगून खंडणी मागण्याचे प्रकार घडत आहेत. रवींद्र ब-हाटे या माहिती अधिकार कार्यकर्त्यांसोबत एक पत्रकार आरोपी होता.

आता पाच हजार रुपयांची खंडणी मागणा-या एका महिलेसह दोन कथित पत्रकारांना पोलिसांनी अटक केली आहे.

बग्गासह महिला अटकेत

हॉटेलमधील परमिट रूममध्ये जाऊन एका वेब पोर्टलचे पत्रकार असल्याचे सांगून एक हजार रुपये घेतल्यानंतरही पाच हजार रूपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेसह दोघा कथित पत्रकारांना खडक पोलिसांनी अटक केली.

Advertisement

हा प्रकार शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौकाजवळ घडला. सतपाल सिंग अमरसिंग बग्गा (वय ५७, रा. वाघोली) व त्याच्या साथीदार महिलेला अटक करण्यात आली.

प्रकरण मिटवायचे असल्यास

याप्रकरणी भैरोबानाला येथील 30 वर्षीय व्यक्तीने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौकात हॉटेल व परमिट रूम आहे.

शनिवारी दुपारी त्यांच्या हॉटेलमध्ये एका महिलेसह दोघेजण आले. त्यांनी “क्राईम चेक टाईम” नावाच्या वेब पोर्टलचे पत्रकार असल्याचे सांगत त्यांचे ओळखपत्र दाखविले.

Advertisement

त्यांनी “तुम्ही अवैधरित्या दारूची विक्री करीत आहात, लोकांना परमीट रूममध्ये बसवून दारू विक्री करीत आहात.

प्रकरण मिटवायचे असल्यास एक हजार रुपये द्या,” अशी मागणी करून एक हजार रूपयांची रक्कम स्वीकारली.

त्यानंतर आरोपींनी परमीट रूम मालकाला फोन करून प्रकरण मिटवायचे असल्यास पुन्हा पाच हजारांची खंडणी मागितली.

Advertisement

सापळा रचून अटक

फिर्यादीने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना सापळा रचून अटक केली. याप्रकरणी संबंधित आरोपींकडील ओळखपत्रे आणि त्यांच्या वेबपोर्टल संदर्भात माहिती घेण्यात येत आहे, असे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी सांगितले.

 

Advertisement
Leave a comment