‘सोशल मीडिया’ तील ओळख एका विवाहितेला चांगलीच महागात पडली आहे. या मैत्रीचा गैरफायदा घेत पंजाबमधील युवकाने तिच्यावर बलात्कार केला.

एवढ्यावरच हा नराधम थांबला नाही, तर तिचे अश्लील फोटो काढले, व्हिडिओ शूटिंग केलं आणि तचे स्टेटसवर टाकले. शिवाय या महिलेकडं एक कोटी रुपयांची खंडणी मागितली.

काय घडलं ?

सोशल मीडियातून ओळख झाल्यानंतर, पंजाबमधील एका तरुणानं पुण्यातील विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Advertisement

आरोपी तरुणानं पीडित महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानं पीडित महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडीओदेखील शूट केले आहेत.

संबंधित व्हिडिओ डिलीट करण्यासाठी आरोपीनं पीडित महिलेकडे तब्बल एक कोटी रुपयांची मागणी केली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंजाबहून पुण्यात

सौरभ सुभाषचंद्र सुखिजा असं गुन्हा दाखल झालेल्या 34 वर्षीय आरोपीचं नाव आहे. आरोपी सुखिजा हा पंजाबमधील पटियाला येथील रहिवासी आहे.

Advertisement

त्याची 2019 मध्ये फेसबुकद्वारे फिर्यादी महिलेशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात संवाद वाढला.

काही दिवसांनी आरोपी सुखिजा खास फिर्यादीला भेटण्यासाठी पंजाबहून पुण्याला आला होता. त्यानं फिर्यादीच्या राहत्या घरात तिच्यावर बलात्कार केला.

व्हिडीओ, फोटो व्हाॅटस्‌ॲपवर

आरोपीनं फिर्यादी महिलेस सरबतातून गुंगीचं औषध दिलं. पीडित महिलेला भूल आल्यानंतर आरोपीनं तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ चित्रीत केले.

Advertisement

यानंतर आरोपीनं संबंधित व्हिडीओ आणि फोटो आपल्या व्हाॅटस्‌ॲप स्टेटसला ठेवले. आरोपी तरुणाच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं वानवडी पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध फिर्याद दिली.