मुंबई – नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने (Rashmika Mandanna) तिच्या लेटेस्ट बोल्ड फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती रंगीबेरंगी ड्रेस परिधान करून बोल्ड स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. सध्या तिचे हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, फॅन्स लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर रश्मिका मंदान्नाचा (Rashmika Mandanna) मोठा चाहता वर्ग आहे.

फोटो शेअर करत रश्मिका मंदान्नाने (Rashmika Mandanna) लिहिले, ‘कालची गोष्ट आहे, तुम्हाला ट्रेलर कसा वाटला’, यासोबतच तिने हार्ट इमोजीही शेअर केला आहे.

रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) लवकरच ‘गुड बाय’ (Goodbye) या चित्रपटात दिसणार आहे. तिच्याशिवाय या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) महत्त्वाच्या भूमिकेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना रश्मिका मंदान्नाने लिहिले, ‘माझ्या वेड्या छोट्या कुटुंबाला भेटा. ते 7 ऑक्टोबरला तुम्हाला सिनेमागृहात भेटायला येत आहे.’ यासोबतच तिने या चित्रपटाच्या पोस्टरची एक झलकही शेअर केली.

यात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत असणार आहेत. तसेच गुड बाय या चित्रपटात मंदाना व्यतिरिक्त नीना गुप्ताची महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटाबद्दल सर्वजण खूप उत्सुक आहेत.

रश्मिका मंदान्ना इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे 30.31 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा तिच्या चाहत्यांशी संवादही साधते.

है रश्मिका मंदान्ना यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक व्यवसाय केला आहे. तिची आणि विजय देवराकोंडाची जोडी खूप प्रसिद्ध आहे. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. तर दोघेही अनेकदा एकमेकांसोबत दिसतात.