ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

देवेंद्रांना राजकीय संन्यास नाही घेऊ देणारःराऊत

मुंबई : सत्ता ताब्यात द्या, इतर मागासवर्यींना चार महिन्यांत आरक्षण दिले नाही, तर राजकीय संन्यास घेऊ, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असताना खासदार संजय राऊत यांनी मात्र देवेंद्रजींना संन्यास घेऊ देणार नाही, त्यांची महाराष्ट्र, देशाला गरज आहे.

त्यांची वीरक्तीची भाषा हा महाराष्ट्रावर अन्याय होईल. चांगल्या नेतृत्त्वाचा राजकारणात तुटवडा आहे. फडणवीसांसारख्या हरहुन्नरी नेत्यांना फकीर होण्याची भाषा योग्य नाही. फडणवीस लढवय्ये नेते आहे, असे म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांना सहकार्य करा

तीन ते चार महिन्यांत ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करून दिलं नाही, तर राजकारणातून संन्यास घेईन असं फडणवीस म्हणाले होते.

त्यावर राऊत यांनी भाष्य केलं. फडणवीस लढवय्ये आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सहकार्य करावं, संन्यास वगैरे घेण्याची भाषा करु नका, त्यासाठी मी त्यांना स्वत: भेटून त्यांना सांगेन तुमचं राजकीय भाषा उज्ज्वल आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.

तेव्हा भांडी फुटत होती

महाराष्ट्रात तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे. तिन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, त्यांच्या राजकीय विचारधारा वेगळ्या असल्या, तरी किमान समान कार्यक्रमानुसार सरकार सुरू आहे. भांड्याला भांडं लागणारच, ते लागायलाही हवंच, तरच संसार टिकतो.

भाजप-शिवसेना युती सरकारमध्येही भांड्याला भांडी लागत होती असं नाही, तर भांडी फुटत होती, तरीही सरकार पाच वर्षे टिकलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारही पाच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

फडणवीस काय म्हणाले होते?

भाजपने 26 जून रोजी ओबीसी आरक्षण पूर्ववत करावं यासाठी चक्का जाम आंदोलन केलं होतं. नागपुरात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडलं.

या वेळी फडणवीसांनी सरकारवर तुफान हल्ला चढवला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं; पण आमच्या हातात पुन्हा सूत्रं दिली, तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असे ते म्हणाले होते.

You might also like
2 li